Advertisement

बिग बॉसच्या घरातून आरती सोलंकी आऊट


बिग बॉसच्या घरातून आरती सोलंकी आऊट
SHARES

हिंदीप्रमाणेच बिग बॉस हा शो नुकताच मराठीमध्येही पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आला. मराठीतील पहिल्या बिग बॉसच्या पर्वाचं पहिलं एलिमिनेशन राऊंड रविवारी पार पडलं. १५ स्पर्धकांमध्ये हा खेळ सुरू आहे. यावेळी अभिनेत्री आरती सोलंकी पहिल्या आठवड्यातच घरातून बाहेर पडली.

विकेंडचा डावमध्ये होस्ट महेश मांजरेकर रविवारी घरातील सदस्यांची भेट घेत त्यांची त्यांची चांगलीच 'शाळा' घेतली. हा एलिमिनेशनचा पहिला आठवडा होता. त्यानुसार पहिल्या आठवड्यात पहिलं एलिमेशन झालं.


आरती सोलंकी पडली बाहेर

बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यात आरती सोलंकी या अभिनेत्रीचं पहिलं एलिमेशन झालं. आरती सोलंकी यांच्यासोबत उषा नाडकर्णी, अनिल थत्ते, भूषण कडू, स्मिता गोंदकर आणि ऋजुता धर्माधिकारी हे कलालाक नॉमिनेट झाले होते.

घरातून बाहेर पडणाऱ्या सदस्याला पुढील आठवड्यात एका व्यक्तीला सुरक्षित करण्याचा अधिकार मिळतो. त्यानुसार आरती सोलंकी यांनी घरातून बाहेर पडल्यानंतर उषा नाडकर्णीं यांना सुरक्षित केलं आहे.


नवा कॅप्टन कोण?

बिग बॉसच्या घरात सुरुवातीला विनीत बोंडे हा कॅप्टन झाला होता. मात्र आता घरातील सदस्यांच्या एकमताने नवा कॅप्टन निवडण्याची संधी बिग बॉसने स्पर्धकांना दिली. त्यानुसार आस्ताद काळे याची नवा कॅप्टन म्हणून निवड झाली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा