Advertisement

दाक्षिणात्य सिनेमाकडे वळली ऋत्विकची पावलं

ऋत्विक आपल्या आगामी ‘सरगम’ या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. मराठी सिनेसृष्टीसोबतच ऋत्विक दाक्षिणात्य सिनेमातही अभिनय करण्यासाठी सज्ज झाला असल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं आहे.

दाक्षिणात्य सिनेमाकडे वळली ऋत्विकची पावलं
SHARES

‘मानसीचा चित्रकार तो’ या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेता ऋत्विक केंद्रेने मराठी सिनेसृष्टीत व नाट्यसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या महिन्यात त्याचा ‘ड्राय डे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. याच ऋत्विकची पावलं आता दक्षिणात्य चित्रपटांकडे वळली आहेत.


अभिनयाचं बाळकडू घरातच

‘ड्राय डे’ या चित्रपटातील ऋत्विकच्या कामाला प्रेक्षकांची पसंती लाभली. सध्या ऋत्विक आपल्या आगामी ‘सरगम’ या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. मराठी सिनेसृष्टीसोबतच ऋत्विक दाक्षिणात्य सिनेमातही अभिनय करण्यासाठी सज्ज झाला असल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं आहे. प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांचा मुलगा असलेल्या ऋत्विकला अभिनयाचं बाळकडू घरातच पाजलं गेलं. लहानपणापासूनच अभिनयाचे संस्कार झाल्यामुळे ऋत्विक नाटक, मालिका, सिनेमा व निर्मिती क्षेत्रांमध्ये अगदी बिनधास्त वावरताना दिसला. 


मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋत्विक दाक्षिणात्य सिनेसृष्टीत लवकरच पदार्पण करणार आहे. या चित्रपटासाठी तो सध्या खूप मेहनत घेत असून, मार्शल आर्ट्सचंसुद्धा प्रशिक्षण घेत आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी तो फिटनेसकडे खूप लक्ष देत आहे. या चित्रपटाचं शीर्षक व कथानकाबद्दल अद्याप काहीही समजू शकलेलं नाही. या चित्रपटाबद्दल अधिकृतरित्या ऋत्विककडून लवकरच काही सांगण्यात येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.



हेही वाचा - 

रोहित-जुईलीचं ‘सरगम टंग ट्विस्टर चॅलेंज’

अभिनेता इरफान खान लवकरच भारतात परतणार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा