Advertisement

रोहित-जुईलीचं ‘सरगम टंग ट्विस्टर चॅलेंज’


रोहित-जुईलीचं ‘सरगम टंग ट्विस्टर चॅलेंज’
SHARES

बऱ्याचदा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी त्याचे अभिनेता-अभिनेत्री आपल्या चाहत्यांना काहीतरी चॅलेंज देऊन चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवताना दिसतात. पण संगीत क्षेत्रातली मंडळी फारच क्वचित असं काही नावीन्यपूर्ण चॅलेंजेंस घेऊन येतात.


सरगम गाऊन दाखवण्याचं चॅलेंज 

मराठी सिनेसृष्टीतले आघाडीचे गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर यांनी एक नवीन चॅलेंज सध्या सोशल मीडियावरून सध्या आपल्या चाहत्यांना आणि सिनेसृष्टीतील मित्र-मैत्रिणींना दिलं आहे. ‘सरगम टंग ट्विस्टर चॅलेंज’ असं या चॅलेंजचं नाव आहे. रोहित-जुईली यांनी नुकताच एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर अपलोड केला आहे. तशी सरगम गाऊन दाखवण्याचं चॅलेंज त्यांनी दिलं आहे. अभिनेता सुयश टिळकसह फिल्म इंडस्ट्रीतल्या काही कलाकारांनी हे चॅलेंज स्विकारून सरगम गातानाचे आपले व्हिडीओजही अपलोड केले आहेत.  


अप्रतिम प्रतिसाद 

या अनोख्या चॅलेंजविषयी रोहित राऊत म्हणाला की, माझ्या सेलिब्रिटी मित्रमैत्रिणींनी आजपर्यंत मला सोशल मीडियावरून वेगवेगळी चॅलेंजेस दिली आहेत. ही चॅलेंजेस स्वीकारणं खूप मजेशीर असतं आणि मला आवडतं. बऱ्याच दिवसांपासून मलाही माझ्या चाहत्यांना आणि नॉन-सिंगर मित्र-मौत्रिणींना असं काही मनोरंजक चॅलेंज द्यावंसं वाटतं होतं. मग जुईलीने मला ही कल्पना सुचवली. मी आणि जुईलीने हे सरगम टंग ट्विस्टर चॅलेंज आमच्या मित्र-मैत्रिणींना आणि सोशल मीडिया फॉलोअर्सना दिलं आहे. सध्या या चॅलेंजला अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे.



हेही वाचा - 

अभिनेता इरफान खान लवकरच भारतात परतणार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा