संजयनं जागवल्या 'ऑल द बेस्ट'च्या स्मृती

येत्या शुक्रवारच्या भागात संजय नार्वेकर 'कानाला खडा' लावणार आहे. संजयनं नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'ऑल द बेस्ट' या नाटकामुळं कलाकार म्हणून संजयच्या कारकिर्दीला एक वेगळीच कलाटणी मिळाली.

SHARE

झी मराठी वाहिनीवरील संजय मोने यांच्या 'कानाला खडा' हा चॅट शो दिवसेंदिवस अधिकच रंगात येऊ लागला आहे. या शोमध्ये आता अभिनेता संजय नार्वेकर 'ऑल द बेस्ट' या नाटकाच्या स्मृती जागवताना दिसणार आहे.


आठवणींना उजाळा 

'कानाला खडा' या कार्यक्रमात अभिनेते संजय मोने कलाकारांशी गप्पा मारतात आणि त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा देतात. त्यासोबतच कलाकारांच्या आयुष्यातील कानाला खडा लावणारे काही किस्से देखील या गप्पांमध्ये रंगतात. हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि नवनवीन व भन्नाट किस्स्यांमुळे रंगणाऱ्या या मैफिलीनं हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत आहे.


संजय नार्वेकरचा सहभाग

येत्या शुक्रवारच्या भागात संजय नार्वेकर 'कानाला खडा' लावणार आहे.  संजयनं नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'ऑल द बेस्ट' या नाटकामुळं कलाकार म्हणून संजयच्या कारकिर्दीला एक वेगळीच कलाटणी मिळाली. हे नाटक कलाकारांनी फुलवलं. आठव्या प्रयोगापासून या नाटकाला जो हाऊसफुलचा बोर्ड लागला तो नाटकाच्या शेवटच्या प्रयोगापर्यंत होता. इतकंच नव्हे तर ३६५ दिवसात या नाटकाचे ४५२ प्रयोग झाले. 


कर्णबधीर चाहता 

या नाटकाचे असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांबद्दलचा किस्सा शेअर करताना संजय म्हणाला की, शिवाजी मंदिरला एक चाहता प्रयोगाला यायचा. त्यानं जवळजवळ १०० हून अधिक प्रयोगांना हजेरी लावली होती. विशेष म्हणजे तो चाहता कर्णबधीर होता, पण आमच्यावरच्या प्रेमापोटी तो पुन: पुन्हा नाटकाला यायचा. इतकंच नव्हे तर त्यानं ५०, १००, १५० प्रयोगाच्या वेळी पेढेही वाटले होते. असे चाहते मिळणं हे आमचं आणि 'ऑल द बेस्ट'चंही भाग्य म्हणावं लागेल.हेही वाचा -

रिंकू-शुभंकरचं रोमँटिक गाणं पाहिलं का?

मृण्मयी म्हणणार 'मनाचे श्लोक'!
संबंधित विषय
ताज्या बातम्या