Advertisement

रिंकू-शुभंकरचं रोमँटिक गाणं पाहिलं का?

सध्या 'कागर' चित्रपटातील युवराज आणि राणीची संपूर्ण महाराष्ट्राभर चर्चा रंगत आहे. ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचं वास्तववादी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात रिंकू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसणार आहे.

रिंकू-शुभंकरचं रोमँटिक गाणं पाहिलं का?
SHARES

सुपरहिट 'सैराट' नंतर रिंकू राजगुरूचा 'कागर' हा चित्रपट २६ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. नवोदित शुभंकर तावडे या चित्रपटात तिच्या जोडीला आहे. या चित्रपटातील एक नवं रोमँटिक गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. 


समाजकारणाचं वास्तववादी चित्रण

सध्या 'कागर' चित्रपटातील युवराज आणि राणीची संपूर्ण महाराष्ट्राभर चर्चा रंगत आहे. ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचं वास्तववादी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात रिंकू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसणार आहे, तर यापूर्वी चित्रपट-नाटकांमध्ये लहानसहान भूमिका साकारणारा  शुभंकर या चित्रपटात प्रथमच मुख्य भूमिका साकारत असून, तो रिंकूचा जोडीदार बनला आहे. टीझर आणि ट्रेलरमुळं उत्सुकता वाढल्यानं या चित्रपटामधील संगीताकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 


दरवळ मव्हाचा

नुकतंच 'कागर' मधील 'दरवळ मव्हाचा...' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्यात शुभंकरनं साकारलेला युवराज आणि राणीच्या रूपातील रिंकूचं हळूवार फुलत जाणारं प्रेम बघायला मिळतं. या गाण्यात रिंकूचे दोन लुक पाहायला मिळतात. दोन्ही लुक्समध्ये ती लक्ष वेधून घेते. याआधी प्रदर्शित झालेल्या 'लागलीया गोडी तुझी...' आणि 'नागिन डान्स...' या गाण्यांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटामधील गाण्यांबरोबरच संवाद देखील लोकांना आवडत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने यांनी केलं आहे.


लिंक  - https://www.youtube.com/watch?v=JUvh4yR5pmE&feature=youtu.beहेही वाचा-

‘जजमेंट’चा थरारक ट्रेलर पाहिला का?

संदीपचा फंकी लुक पाहिला का?
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा