Advertisement

संदीपचा फंकी लुक पाहिला का?

'श्वास', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'टाइमपास २', 'रंगा पतंगा' असा रुपेरी पडद्यावरील संदिपचा प्रवास त्याच्यातील कुशल अभिनेत्याचं दर्शन घडवण्यासाठी पुरेसा आहे. आता तो 'मोगरा फुलला' या आगामी मराठी चित्रपटात आजवर कधीही न पाहिलेल्या गेटअपमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संदीपचा फंकी लुक पाहिला का?
SHARES

अभिनेता संदीप पाठकनं नेहमीच काहीतरी वेगळं करत प्रेक्षकांच्या मनात घर करण्याचा प्रयत्न केला आहे. 'वऱ्हाड निघालंय लंडनला' या एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवर डॅा. लक्ष्मणराव देशपांडे यांच्या स्मृती पुन्हा जागृत करणारा संदीप आता एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. संदीपचा हा काहीसा फंकी लुक पाहिला का?


वेगळ्या गेटअपमध्ये

'श्वास', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'टाइमपास २', 'रंगा पतंगा' असा रुपेरी पडद्यावरील संदीपचा प्रवास त्याच्यातील कुशल अभिनेत्याचं दर्शन घडवण्यासाठी पुरेसा आहे. आता तो 'मोगरा फुलला' या आगामी मराठी चित्रपटात आजवर कधीही न पाहिलेल्या गेटअपमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, यात अभिनेता स्वप्नील जोशीनं या चित्रपटात सुनील कुलकर्णी या तरुणाची भूमिका साकारली आहे.

 

नवं पोस्टर प्रकाशित 

या चित्रपटात संदीपनं स्वप्नीलच्या मित्राची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तो सॉफ्टवेअर व्यावसायिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आपण नेहमीच इच्छित असलेल्या कोणत्याही चांगल्या मित्रासारखं या दोघांचं नातं आहे. सॉफ्टवेअरच्या व्यवसायामध्ये या दोन मित्रांची भागीदारीही आहे. सुनीलसारख्या मित्राला मदत करायला हा मित्र नेहमी तयार असतो, पण ते त्याला जमतंच असं नाही. याच कारणामुळं सोपं काम अवघड करणारे मित्र कठीण असतात... या टॅगलाइनसह नुकतंच 'मोगरा फुलला'चं एक नवं पोस्टर प्रकाशित करण्यात आलं आहे. 


मित्रांची केमिस्ट्री

या पोस्टरमध्ये स्वप्नील आणि चित्रपटात त्याचा मित्र बनलेला संदीप यांचा वेगळाच लुक बघायला मिळतो. आजवर कधीही न पाहिलेलं संदीपचं रूप यात आहे. या दोन मित्रांची केमिस्ट्री कशी जुळली आहे ते चित्रपट पाहिल्यावरच समजेल. या अतिशय वेगळ्या गेटअपमधील भूमिकेविषयी संदीप म्हणाला की, चांगल्या कथानकात आपला सहभाग असावा, असं मला अभिनेता म्हणून नेहमी वाटत असतं. प्रत्येक व्यक्तिरेखेला महत्व असलेला सिनेमा करायला मिळावा. उत्तम दिग्दर्शक, अनुभवी कलाकारांसोबत काम करता यावं आणि दर्जेदार प्रोजेक्टमधे आपला खारीचा तरी वाटा असावा, असंही वाटतं. या सर्व इच्छा  'मोगरा फुलला' या चित्रपटानं पूर्ण केल्या आहेत.


१४ जूनला प्रदर्शित 

'मोगरा फुलला' हा चित्रपट १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नाजूक नात्यांचा गुंफलेला हा गजरा म्हणजेच 'मोगरा फुलला'! या भावनिक टॅगलाईनसह प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात स्वप्नील आणि संदीपबरोबर चंद्रकांत कुलकर्णी, सई देवधर, नीना कुळकर्णी, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आनंद इंगळे, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.हेही वाचा -

रुपेरी पडद्यावर माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर

सावरलेल्या प्रेमाची गोष्ट सांगणार ‘पेठ’
संबंधित विषय
Advertisement