सावरलेल्या प्रेमाची गोष्ट सांगणार ‘पेठ’

प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. या भावनेचं महत्त्व प्रत्येकाच्या मनात वेगळं असतं. नात्यातले अनुबंध जपत प्रेमाची अनोखी ‘पेठ’ उलगडणारा प्रेमपट लवकरच मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे.

SHARE

मराठीत नेहमीच नवनवीन विषयांवर आधारित चित्रपट बनत असतात. लहानसहान गोष्टींतूनही खूप मोलाचा संदेश देण्याची परंपरा मराठीला लाभली आहे. हिच परंपरा जोपासत ‘पेठ’ हा आगामी चित्रपट सावरलेल्या प्रेमाची गोष्ट सांगण्यासाठी सज्ज होत आहे.


प्रेमावर आधारित चित्रपट

आजवर प्रेमावर आधारित असंख्य चित्रपट बनले असले तरी या विषयाचं आकर्षण मात्र तसूभरही कमी झालेलं नाही. जुन्या पिढीतील दिग्दर्शकांइतकंच नव्या पिढीतील दिग्दर्शकांनाही या विषयाचं आकर्षण आहे. त्यामुळंच या एकाच विषयावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून कायम प्रेमावर आधारित चित्रपट बनत असतात. दिग्दर्शक अभिजीत साठेही ‘पेठ’ या चित्रपटाच्या माध्यमातून असाच प्रयत्न करण्यासाठी सज्ज झाले आहेत.


पोस्टर अनावरण

प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. या भावनेचं महत्त्व प्रत्येकाच्या मनात वेगळं असतं. नात्यातले अनुबंध जपत प्रेमाची अनोखी ‘पेठ’ उलगडणारा प्रेमपट लवकरच मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. पोस्टर अनावरणानं ‘पेठ’चा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. शारदा फिल्म प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘पेठ’ चित्रपटाची निर्मिती वीरकुमार शहा यांनी केली असून, दिग्दर्शनासोबतच अभिजित साठे यांनीच या चित्रपटाच्या लेखन व कला दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.


वेगळ्या धाटणीची प्रेमकथा 

प्रेम करणं ही एक सहजवृत्ती आहे. प्रेम निभावणं मात्र आज जिकरीची गोष्ट आहे. अशाच विखुरलेल्या विश्वातील सावरलेल्या प्रेमाची गोष्ट ‘पेठ’ या चित्रपटात असून, वेगळ्या धाटणीची ही प्रेमकथा प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास साठे यांनी व्यक्त केला आहे. वृषभ शहा आणि नम्रता रणपिसे ही नवी जोडी या चित्रपटात आहे. वृषभला घरातून कलेचा वारसा लाभला असला तरी नम्रतानं मात्र आवडीनं स्ट्रगल करत चित्रपटसृष्टीची वाट चोखाळली आहे. यासोबत अभिषेक शिंदे, राज खंदारे, संकेत कदम या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.हेही वाचा -

ही नवी कोरी जोडी नक्की पहा...

रिंकूच्या ‘कागर’चा ट्रेलर पाहिला का?
संबंधित विषय
ताज्या बातम्या