Advertisement

ही नवी कोरी जोडी नक्की पहा...

कियारा हे नाव एव्हाना महाराष्ट्राच्या घराघरांत परिचयाचं झालं आहे. कियाराबाबत महिलावर्गाच्या मनात प्रचंड चीड आहे. याच कारणामुळं 'घाडगे आणि सून' या मालिकेमधील ही व्यक्तिरेखा बऱ्याचदा महिलांच्या निंदा-नालस्तीची बळी ठरत आहे. प्रतीक्षा मुणगेकरनंच 'घाडगे आणि सून'मध्ये कियारा ही व्यक्तिरेखा साकारली आहे.

ही नवी कोरी जोडी नक्की पहा...
SHARES

रुपेरी पडद्यावर नेहमीच नवनवीन जोड्या जुळत असतात. अशीच एक नवी कोरी जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बाबो' या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना ही नवीन जोडी भेटणार आहे.


अमोल-प्रतीक्षा प्रथमच एकत्र

निर्मात्याच्या रूपात आजवर काही चित्रपटांची निर्मिती, तर काहींची प्रस्तुती केल्यानंतर तरुण निर्माता अमोल कागणे आता मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आजवर लहानसहान भूमिकांमध्ये दिसणाऱ्या अमोलनं 'बाबो' या चित्रपटात नायक साकारला आहे. या चित्रपटात त्याच्या जोडीला प्रतिक्षा मुणगेकर ही अभिनेत्री दिसणार आहे. 'बाबो' या चित्रपटाच्या निमित्तानं अमोल-प्रतीक्षा यांनी प्रथमच एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रमेश साहेबराव चौधरी यांनी केलं आहे.


मोठ्या पडद्यावर नायिका

कियारा हे नाव एव्हाना महाराष्ट्राच्या घराघरांत परिचयाचं झालं आहे. कियाराबाबत महिलावर्गाच्या मनात प्रचंड चीड आहे. याच कारणामुळं 'घाडगे आणि सून' या मालिकेमधील ही व्यक्तिरेखा बऱ्याचदा महिलांच्या निंदा-नालस्तीची बळी ठरत आहे. प्रतीक्षा मुणगेकरनंच 'घाडगे आणि सून'मध्ये कियारा ही व्यक्तिरेखा साकारली आहे. आतापर्यंत छोट्या पडद्यावर खलनायकी भूमिकेत दिसलेली प्रतीक्षा मोठ्या पडद्यावर नायिका बनली आहे. 'बाबो' या चित्रपटात ती नायिका बनून प्रेक्षकांवर मोहिनी घालणार आहे.


दोघांसाठी मोठा ब्रेक

प्रतीक्षा 'बाबो' या चित्रपटात अमोलच्या प्रेयसीच्या रूपात दिसणार आहे. नटखट, प्रेमळ, लाघवी आणि तितकीच समंजस प्रतीक्षा श्रीमंत घराण्यातली आहे. याउलट अमोल हा मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण आहे. अमोल आणि प्रतिक्षाच्या प्रेमाला समाजमान्यता लाभते का ? याचं उत्तर 'बाबो'मध्ये मिळणार आहे. अमोलनं पुण्यामधील ललित कला केंद्रातून नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं असून, २६ हून अधिक नाटकांत अभिनय केला आहे. प्रतीक्षानं यापूर्वी 'विडा एक संघर्ष' आणि 'मातंगी' हे चित्रपट केले आहेत. त्यामुळे दोघांसाठी हा एक मोठा ब्रेक असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.



हेही वाचा -

पहा, सईचा हटके लुक!

सलीम खान, मधुर भंडारकर, हेलन यांना मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा