पहा, सईचा हटके लुक!

सई सध्या आपल्या आगामी चित्रपटांच्या कामात बिझी आहेच; परंतु त्यासोबतच ती हिंदीतील सेलिब्रिटींच्या खांद्याला खादा लावून मोठमोठ्या कार्यक्रमांनाही हजेरी लावत आहे. त्यातूनच वेळ मिळेल तेव्हा आपले सुंदर फोटो काढून चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअरही करत आहे.

  • पहा, सईचा हटके लुक!
  • पहा, सईचा हटके लुक!
  • पहा, सईचा हटके लुक!
SHARE

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर दिवसेंदिवस अधिकाधिक हॅाट दिसू लागली आहे. मागील काही दिवसांपासून सईला फोटोशूट करण्याचं जणू वेडच लागलंय की काय असं वाटावं इतके फोटो ती सध्या काढून घेत आहे. हे सारं ती करते आहे ते आपल्या चाहत्यांसाठी. सईच्या याच चाहत्यांसाठी तिचा हटके लुक दाखवणारे हे खास फोटो...


भूमिकांचं कौतुक 

मराठी सिनेसृष्टीत आघाडीवर असलेली सई आज हिंदी चित्रपटसृष्टीतही चांगलीच रुळली आहे. मागच्या वर्षी सईचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. मराठी 'राक्षस' आणि हिंदी 'लव्ह सोनिया' या दोन्ही चित्रपटांमध्ये सईनं साकारलेल्या भूमिकांचं कौतुक करण्यात आलं. असं असलं तरी सई सध्या काय करत आहे हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडणं सहाजिक आहे.


स्पेशल फोटोशूट

सई सध्या आपल्या आगामी चित्रपटांच्या कामात बिझी आहेच; परंतु त्यासोबतच ती हिंदीतील सेलिब्रिटींच्या खांद्याला खादा लावून मोठमोठ्या कार्यक्रमांनाही हजेरी लावत आहे. त्यातूनच वेळ मिळेल तेव्हा आपले सुंदर फोटो काढून चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअरही करत आहे. कित्येकदा ती आपल्या खास ड्रेसेससोबत स्पेशल फोटोशूटही करवून घेत आहे.


स्माईलने खुललं सौंदर्य 

सईचे हे फोटो त्यापैकीच आहेत. या फोटोंमध्ये सईचा एक वेगळाच लुक पाहायला मिळतो. डार्क गुलाबी आणि सफेद रंगाचे स्ट्राईप्स असलेलं ब्लेझर आणि पँट सईनं परिधान केली आहे. एखाद्या विदेशी अभिनेत्रीप्रमाणं असलेल्या या लुकमध्ये मोकळे सोडलेले केस आणि चेहऱ्यावरील स्माईल सईचं सौंदर्य अधिकच खुलवतं. त्यातूनच समोर आलेला सईचा हा काहीसा वेगळा लुक तिला शोभून दिसतो.हेही वाचा -

सलीम खान, मधुर भंडारकर, हेलन यांना मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार

विकी बनणार 'अश्वत्थामा'!संबंधित विषय
ताज्या बातम्या