Advertisement

शाहरुख खाननंतर संजय दत्तची उतरला क्रिकेटच्या मैदानात, 'ही' टीम विकत घेतली

2022 पर्यंत, त्यांची एकूण संपत्ती INR 137 कोटींहून अधिक होती

शाहरुख खाननंतर संजय दत्तची उतरला क्रिकेटच्या मैदानात, 'ही' टीम विकत घेतली
SHARES

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त क्रिकेटच्या मैदानात उतरला आहे. आजकाल फ्रँचायझी क्रिकेट झपाट्याने वाढत आहे. झिम्बाब्वे 'झिम आफ्रो टी 10' स्पर्धेचे आयोजन करण्याच्या तयारीत आहे. ही स्पर्धा 20 जुलैपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत, बॉलीवूड अभिनेता संजय दत्त हा एरीज ग्रुप ऑफ कंपनीजचे सर सोहन रॉय यांच्यासह हरारे हरिकेन्स संघाचा सह-मालक बनला आहे.

झिम्बाब्वे आयोजित, या स्पर्धेत एकूण पाच संघ सहभागी होतील, ज्यामध्ये - डर्बन कलंदर, केप टाउन सॅम्प आर्मी, बुलावायो ब्रेव्ह्स, जोबर्ग लायन्स आणि हरारे हरिकेन्स उपस्थित आहेत. लीगमध्ये सामील होणारा डर्बन कलंदर संघ हा पाकिस्तान सुपर लीग फ्रँचायझी लाहोर कलंदर संघ आहे.

Zim Afro T10 हा हरारे येथे होणारा झिम्बाब्वेमधील पहिला फ्रेंचाइजी क्रिकेट स्पर्धा असेल.  झिम आफ्रो स्पर्धेचा हा पहिला हंगाम असेल. त्याचवेळी, संजय दत्तने या स्पर्धेतील संघाचा सहमालक होण्याचा उत्साह व्यक्त केला आहे. यासह त्याने हरारे हरिकेन्स स्पर्धेत चांगली कामगिरी करून झिम्बाब्वेमधील क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त म्हणाला, "क्रिकेट हा भारतातील धर्मासारखा आहे आणि सर्वात मोठ्या क्रीडा पैकी एक असल्याने, मला वाटते की हा खेळ जगासमोर नेणे हे आपले कर्तव्य आहे."



हेही वाचा

रणदीप हुडाच्या 'स्वतंत्र वीर सावरकर' चित्रपटाच्या टिझरवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू नाराज

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा