काजोलने अजयला दिले मराठीचे धडे


  • काजोलने अजयला दिले मराठीचे धडे
  • काजोलने अजयला दिले मराठीचे धडे
  • काजोलने अजयला दिले मराठीचे धडे
  • काजोलने अजयला दिले मराठीचे धडे
  • काजोलने अजयला दिले मराठीचे धडे
SHARE

मुंबई - प्रत्येकालाच पोट धरून हसायला लावणारा कॉमेडी सिरियल म्हणजे 'चला हवा येऊ द्या'. या मंचावरून आजवर अनेक मराठी नाटक आणि चित्रपटांना प्रसिद्धीच्या हक्काचं व्यासपीठ मिळालं. या मंचाची लोकप्रियतेचा बोलबाला बॉलिवूडमध्येही मोठ्या प्रमाणावर आहे, म्हणूनच तर या सेटवर रितेश देशमुख, जॉन अब्राहम, वरुण धवन, सोनम कपूर, विद्या बालन, इरफान खान या कलाकारांसोबतच शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार सारख्या आजच्या घडीच्या सुपरस्टार्सनीही हजेरी लावली. आता या यादीत आणखी एका स्टारचा समावेश झाला आहे. बॉलिवूडचा अॅक्शन हिरो आणि संवेदनशील अभिनेता अजय देवगण आपल्या ‘शिवाय’ चित्रपटासाठी या मंचावर आला होता. अजय देवगण या कार्यक्रमात आपली पत्नी आणि अभिनेत्री काजोलसह सहभागी झाला. त्यांच्यासोबतीनं संगीतकार मिथुनसुद्धा उपस्थित होते.

या भागाचं वैशिष्ट्य म्हणजे यात काजोलने मराठी भाषेत संवाद साधला. अजयनेही मराठी बोलण्याचा प्रयत्न केला ज्याला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या दोघांचं हे मराठमोळं रुप येत्या २४ आणि २५ ऑक्टोबरला रात्री ९.३० वा. झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या 'चला हवा येऊ द्या'च्या दोन्ही भागांमधून बघायला मिळेल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या