अक्षयचाही जीव रंगला ...

Goregaon
अक्षयचाही जीव रंगला ...
अक्षयचाही जीव रंगला ...
अक्षयचाही जीव रंगला ...
अक्षयचाही जीव रंगला ...
See all
मुंबई  -  

मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार त्याच्या ‘जॉली एलएलबी 2’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत दिसणार आहे.

कोल्हापूरच्या लाल मातीतला रांगडा गडी राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेली अंजली यांची प्रेमकथा चांगलीच बहरली आहे. आता याच प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी त्याच्या मदतीला येतोय जगदीश्वर मिश्रा उर्फ जॉली म्हणजेच बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षयकुमार. ‘तुझ्यात जीव रंगला’च्या या विशेष भागाचं चित्रीकरण नुकतंच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलं. मालिकेचे हे विशेष भाग 1 आणि 2 फेब्रुवारीला संध्याकाळी 7.30 वा. झी मराठीवरून प्रेक्षकांना बघायला मिळतील.
या मालिकेत राणाची भूमिका निभावणारा हार्दिक जोशी याला 'सुपरस्टार अक्षयकुमार सेटवर येणार हे शेवटपर्यंत माहीत नव्हतं. फक्त कुणीतरी स्पेशल कॅरेक्टर असणार एवढंच सांगण्यात आलं होतं, शूट सुरू झालं आणि अचानक अक्षयची एन्ट्री झाली, तेव्हा एक क्षण विश्वासच बसला नसल्याचं त्याने सांगितलं. हे सारं स्वप्नाप्रमाणेच होतं. अक्षयसोबत हे सीन करताना खूप छान वाटलं. आधी दडपण होतं पण अक्षयने खूप कम्फर्टेबल केलं' अशा शब्दात हार्दिकने भावना व्यक्त केल्या.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.