अक्षयकुमार साकारणार गुलशनकुमार

  Mumbai
  अक्षयकुमार साकारणार गुलशनकुमार
  मुंबई  -  

  मुंबई - कॅसेटकिंग गुलशनकुमार यांच्यावर मोगल नावाचा चित्रपट बनतो आहे. यामधील शीर्षक व्यक्तिरेखेसाठी अक्षयकुमारची निवड करण्यात आली आहे. गुलशनकुमार यांची पत्नी सुदेश कुमारी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. जॉली एलएलबी फेम दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी या चित्रपटाचं लेखन केलं असून तेच या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. कपूर यांनी काही महिन्यांपूर्वी यशस्वी ठरलेल्या जॉली एलएलबी 2 चित्रपटासाठी अक्षयला दिग्दर्शन केलं होतं. 2017च्या उत्तरार्धात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून तो 2018 मध्ये प्रदर्शित होईल. गुलशनकुमार यांनी सुरू केलेल्या कॅसेट व्यवसायाला 1990 च्या दशकात मोठी भरभराट आली होती. काही यशस्वी चित्रपटांचीही त्यांनी निर्मिती केली होती. 1997 मध्ये त्यांची मुंबईत हत्या झाली होती.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.