Advertisement

अल्लू अर्जुनचा पुष्पा 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा प्रदर्शित झालेला ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

अल्लू अर्जुनचा पुष्पा 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार
SHARES

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा प्रदर्शित झालेला ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. कोरोनामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवल्यामुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

‘पुष्पा द राइज’ या चित्रपटानं कमाईच्या बाबतील अनेक रेकॉर्ड केले आहेत. आता हा चित्रपट ७ जानेवारी रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूने आयटम साँग देखील केले आहे. या चित्रपटानं जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड केला आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा