Advertisement

पान मसाल्याच्या जाहिरातीवरुन वादात सापडले अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पान मसाल्याच्या जाहिरातीवरुन वादात सापडले आहेत.

पान मसाल्याच्या जाहिरातीवरुन वादात सापडले अमिताभ बच्चन
SHARES

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पान मसाल्याच्या जाहिरातीवरुन वादात सापडले आहेत. पान मसाल्याची जाहिरात केल्यानं त्यांच्यावर अनेक चाहते नाराज झाले होते.

आता याप्रकरणी राष्ट्रीय तंबाखूविरोधी संघटनं (एनजीओ)ने बिग बींना एख पत्र पाठवले आहे. लवकरात लवकर या जाहिरातीच्या कॅम्पेनमधुन बाहेर पडण्याची विनंती त्यांनी बिग बिंना केली आहे.

अलीकडेच आलेल्या एबीपीच्या वृत्तानुसार नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर एरडिकेशन ऑफ टोबॅको या संघटनेचे अध्यक्ष शेखर साळकर यांनी बिग बींना यासंदर्भात पत्र पाठवले आहे.

ते म्हणाले की, ‘संशोधनात पान मसाला आणि तंबाखूच्या व्यसमानुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात हे सिद्ध झाले आहे. विशेषतः तरुणांसाठी हे अधिक हानीकारक आहे. मिस्टर बच्चन हे सरकारच्या पल्स पोलिओ जाहिरातीच्या मोहिमेचे ब्रॅण्ड एम्बेसेडर आहेत तर त्यांनी पान मसाल्याच्या जाहिरातीतून लवकरात लवकर बाहेर पडणं गरजेचं आहे.’

शेखर साळकर यांनी या पत्रात इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) यांच्या पुराव्यांचा दाखला दिला आहे. पान सुपारीमधील कार्सिनोजेन्समुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो असा दावा त्यांनी केला आहे.

ते म्हणाले, 'ऑन्कोलॉजिस्ट आणि तंबाखू बंदीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेचा सदस्य या नात्यानं मला दु:ख होत आहे की, बॉलिवूडमधील शाहरुख खान, अजय देवगण, रणवीर सिंह अशा अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी अशा जाहिराती केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूचे सेवन वाढू लागलं आहे.'

एका युजरच्या कमेंटला अमिताभ यांनी उत्तर दिलं होतं. ते म्हणाले की, 'मला माफ करा कोणत्या व्यवसायाला कमी जास्त मानू नये, आपल्यामुळे जर एखाद्याचे भले होत असेल तर ते करायला हरकत आहे. जर एखादा व्यवसाय असेल तर आपल्याला आपल्या व्यवसायाबद्दल देखील विचार करावा लागतो. आता तुम्हाला असे वाटतं की मी ही जाहिरात करायला नको होती पण मला यासाठी मानधान मिळतं. आमच्या व्यवसायात काम करणारे अनेक लोक आहेत, ज्यांना रोजगार आणि मानधन मिळतं आणि माझे काही चुकलं असेल तर पुन्हा मला माफ करा.'



हेही वाचा

राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह सुरू होणार, राज्य सरकारचा निर्णय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा