SHARE

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे प्रेमीयुगुल सोशल मीडिया पुन्हा एकदा धुमाकूळ घालत आहेत. पण या वेळी कोणत्या फोटोमुळे नाही तर जाहिरातीमुळे. दिवाळीनिमित्त सर्वांचीच आवडती जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांनी 'मान्यवर' या कपड्यांच्या ब्रँडसाठी जाहिरात केली होती. ही जाहिरात पाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आली. #NayeRishteNayeVaade अशी या जाहिरातीची टॅगलाइन आहे. 
'मान्यवर'च्या जाहिरातीत 'विरुष्का'ची अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. जाहिरातीत एक जोडपं लग्नाच्या वेळी एकमेकांना वचन देत असतं. ते नेमके काय वचन देत असतील याचा अंदाज अनुष्का आणि विराट लावत असतात. मुलाचं वचन सांगताना विराट म्हणतो की, 'मी तुझ्यासाठी महिन्यातील १५ दिवस जेवण बनवेल.' त्यावर अनुष्का म्हणते, 'मी कसलीच तक्रार न करता तू केलेलं जेवण जेवेन.' असी वचनं अनुष्का आणि विराट घेतात. ही जाहिरात अपलोड होताच अक्षरश: लाईक्सचा पाऊस पडला आहे. 
संबंधित विषय
ताज्या बातम्या