Advertisement

चुलबुल पांडेशी पुन्हा होणार गाठभेट..'दबंग-३' ची घोषणा!


चुलबुल पांडेशी पुन्हा होणार गाठभेट..'दबंग-३' ची घोषणा!
SHARES

सलमान खानच्या सर्व सिनेमांना प्रेक्षक भरभरून दाद देतात. सलमानचा असा एकही सिनेमा नसेल, ज्याला प्रेक्षकांनी उचलून धरलं नाही. त्यातलेच आहेत 'दबंग' आणि 'दबंग २'. या सिनेमांमधल्या 'चुलबुल' या कॅरेक्टरने प्रेक्षकांना वेड लावलं. आता हेच कॅरेक्टर प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येणार आहे. याची माहिती खुद्द दबंग चित्रपटाचा निर्माता अरबाज खान याने दिलीये. पुढच्या वर्षी २०१८मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

अरबाज खाननं त्याचा आगामी चित्रपट 'तेरा इंतजार'च्या ट्रेलर लॉन्चवेळी 'दबंग-३'चीही घोषणा केली. चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू आहे. २०१८मध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल, असं अरबाज खान म्हणालाय. सिनेमात अजून कोण असेल? सलमान बरोबर कोणती हिरोईन दिसेल? ही माहिती अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. पण या बातमीने चुलबुल पांडेचे चाहते मात्र खुश झाले आहेत हे नक्की!



हेही वाचा

नवाजुद्दीन सिद्दीकीला अखेर त्याची 'किंमत' कळली!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा