Advertisement

आशा भोसले यांना महावितरणचा 'शॉक'


आशा भोसले यांना महावितरणचा 'शॉक'
SHARES

मुंबई - ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ अर्थात महावितरण नं ‘धक्का’ दिलाय. लोणावळा येथील बंगल्याचं गेल्या काही महिन्यांतली विज बिलाची रक्कम पाहून आशा भोसले यांची अवस्था आश्चर्याचा ‘करंट’ लागल्यासारखीच झालीय. लोणावळ्यात तुंगार्ली तलाव रोड परिसरात आशा भोसले यांचा बंगला आहे. महिन्यातून जास्तीत जास्त दोन ते तीन दिवस त्यांचं बंगल्यावर वास्तव्य असतं. विजेचा वापर मर्यादित असूनही बंगल्यातलं वीज बिल हे रु. 50 हजार ते 80 हजारच्या घरात असतं, अशी आशा भोसले यांची तक्रार आहे. ऑक्टोबर महिन्यातलं वीज बिल घेऊन स्वराशेनं भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या मध्यस्थीनं उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दाद मागत दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केलीय. उर्जामंत्र्यांनी याबाबतीत महावितरणचे पुणे येथील मुख्य अभियंता मुंडे यांना तत्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement