अस्तित्व एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी


SHARE

माटुंगा - 30 व्या अस्तित्व आयोजित 'कल्पना एक अविष्कार अनेक' या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी येत्या शनिवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह माटुंगा येथे आयोजित केली आहे.

या एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच झाली असून, 25 पैकी 5 एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत.
अंतिम फेरीतील बहुतांश एकांकिका जातिव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या आहेत. अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या एकांकिकांमध्ये प्रवेश मुंबईची 'प्रारंभ', इंद्रधनु मुंबईची 'विभवांतर', समर्थ अँकँडमी पुणेची 'सेकंड हँड', अंतरंग थिएटर ची 'आस्वल', फिनिक्स मुंबई ची 'मयसभा' यांचा समावेश आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या