शाहरुख, तो आणि ती...


  • शाहरुख, तो आणि ती...
SHARE

बॉलिवुडचा किंग शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रोज चाहत्यांच्या गर्दीत असलेला शाहरुख खान आपल्या एका चाहत्यावर भलताच भडकलेला दिसून आला आहे. शाहरुख खानचा त्याच्या फॅनवर भडकलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरूखला घेरलेल्या सुरक्षारक्षकांनी चाहत्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. मात्र शाहरुखनंच या तरूणाला धक्काबुक्की केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. हा तरूण शाहरूखसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. विशेष बाब म्हणजे त्यानंतर लगेचच शाहरूखनं एका तरूणीसोबत सेल्फी काढला. त्यामुळे आधीच्या तरूणाचं नक्की चुकलं कुठे? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. 'द रिंग' या आगामी सिनेमाच्या शुटिंगसाठी शाहरुख सध्या अॅम्स्टरडॅममध्ये आहे. त्यादरम्यान ही घटना घडली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या