राजामौलींच्या 'आरआरआर'चं दुसरं शेड्युल सुरू

दिग्दर्शक एस. एस. राजामौली या नावाला आता कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज राहिलेली नाही. 'बाहुबली' सारखे दोन सुपरडुपरहिट सिनेमे देणारे राजामौली सध्या 'आरआरआर' या सिनेमाच्या कामात व्यग्र आहेत. या सिनेमाच्या चित्रीकरणाचं दुसरं शेड्युल सुरू झालं आहे.

  • राजामौलींच्या 'आरआरआर'चं दुसरं शेड्युल सुरू
SHARE

दिग्दर्शक एस. एस. राजामौली या नावाला आता कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज राहिलेली नाही. 'बाहुबली' सारखे दोन सुपरडुपरहिट सिनेमे देणारे राजामौली सध्या 'आरआरआर' या सिनेमाच्या कामात व्यग्र आहेत. या सिनेमाच्या चित्रीकरणाचं दुसरं शेड्युल सुरू झालं आहे.

आजवरच्या सिनेमांप्रमाणेच राजामौली यांचा 'आरआरआर' हा सिनेमाही मेगा बजेट असल्याचं सांगितलं जात आहे. युवा टायगर एनटीआर आणि मेग पॅावरस्टार राम चरण यांच्या मुख्य भूमिका या सिनेमात आहेत. नोव्हेंबर महिन्यात राजामौली यांनी प्रभास, राणा दग्गुबत्ती, कल्याण राम, कोराताला शिवा, बोयापती श्रीनू, वामशी पेडिपल्ली, वेंकी एटलूरी, सुरेश बाबू, अल्लू अरविंद, शोबू यारलागड्डा, केएल नारायण आणि श्याम प्रसाद रेड्डी या दक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत 'आरआरआर'च्या चित्रीकरणाला प्रारंभ केला होता.सोशल मिडियावर पोस्ट

'बाहुबली' फ्रेंचायसीला मिळालेल्या भरघोस यशानंतर राजामौली आणखी एक बहुभाषिक सिनेमा बनवत आहेत. या सिनेमाकडे राष्ट्रीय सिनेसृष्टीतील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टच्या रूपात पाहिलं जात आहे. या सिनेमाचा अनुभव 'बाहुबली - द कन्क्लुजन'च्या भव्यतेच्याही पलिकडे नेत एका अद्भुत विश्वाची सफर घडवणारा ठरेल असं बोललं जात आहे. या सिनेमाच्या दुसऱ्या शेड्युलची घोषणा करताना 'सेटवर परतलो आहोत. दुसरं शेड्युल आजपासून सुरू', अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.


बाहुबलीचीच टीम

या सिनेमाचं संवाद लेखन साई माधव बुर्रा आणि मदन कार्की यांनी केलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते फिल्म एडीटर श्रीकर प्रसाद या सिनेमाचं एडिटींग करत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने राजामौली पुन्हा एकदा 'बाहुबली'साठी काम केलेल्या आपल्या ड्रीम टीमसोबत काम करत आहेत. यात विजयेंद्र प्रसाद सारख्या नामवंत कथा लेखकांचाही समावेश आहे. कॉस्ट्यूम डिज़ाइनर रामा राजामौली, व्हीएफएक्स सुपरवाइज़र वी. श्रीनिवास मोहन, संगीत एमएम केरावनी, प्रोडक्शन डिज़ाइन साबू सिरिल आणि सिनेमॅटोग्राफर केके सेंथिल कुमार आदी तंत्रज्ञांचा समावेश आहे. या सिनेमाची पटकथा डीव्हीव्ही दानय्या यांनी लिहिली आहे.हेही वाचा -

शिवाजी पार्कवर स्वप्नीलच्या बॅटचा जलवा

दक्षिणात्य भाषेत बनणार 'उरी'चा रीमेक!संबंधित विषय
ताज्या बातम्या