Advertisement

दक्षिणात्य भाषेत बनणार 'उरी'चा रीमेक!

या वर्षी बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक' या पहिल्या हिंदी चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत आहे. बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता या चित्रपटाचा रिमेक दक्षिणात्य भाषांमध्येही करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दक्षिणात्य भाषेत बनणार 'उरी'चा रीमेक!
SHARES

या वर्षी बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक' या पहिल्या हिंदी चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत आहे. बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता या चित्रपटाचा रिमेक दक्षिणात्य भाषांमध्येही करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.


तिकीटबारीवर चलती

बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज यश मिळवत आरएसव्हीपीचा या वर्षातील पहिला हिट चित्रपट बनलेल्या 'उरी'चा रिमेक तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या दक्षिणात्य भाषांमध्ये करण्यात येणार आहे. उरीमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैनिकांनी घरात घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. तिकीटबारीवर यशस्वी ठरलेला हा सिनेमा १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे.


देशभरात कौतुक

प्रदर्शनानंतर या चित्रपटाने अवघ्या नऊ दिवसांच्या आत एकूण ९१ कोटी ८४ हजार रुपयांचा गल्ला जमवण्यात यश मिळवलं. संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांनी या सिनेमाचं कौतुक केल्यानेच 'उरी'चा रिमेक दक्षिणात्य भाषांमध्येही करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं. यासाठी 'उरी'चे निर्माते रॅानी स्क्रूवाला आणि आरसीव्हीपीच्या टीमला दक्षिणेकडील काही निर्मात्यांचे फोनही आले आहेत. या निर्मात्यांना 'उरी' आपल्या प्रादेषिक भाषेमध्ये बनवण्याची इच्छा आहे.


राष्ट्राभिमान जागृत करणारा सिनेमा

'उरी'मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेल्या विकी कौशलच्या जोडीला मोहित रैना, परेश रावल, यामी गौतम आणि किर्ती कुल्हारी यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांचंही सर्वांनी कौतुक केलं होतं. २०१६मध्ये भारतीय सैनिकांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या स्मृती जागविणाऱ्या या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात पुन्हा एकदा राष्ट्राभिमान जागृत करण्यात यश मिळवलं आणि त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर दिसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.हेही वाचा -

‘रॉकेट्री’साठी माधवन बनला दिग्दर्शक !

‘टोटल धमाल’ ला २२ फेब्रुवारीचा मुहूर्तसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा