Advertisement

‘टोटल धमाल’ ला २२ फेब्रुवारीचा मुहूर्त

१४ जानेवारीला टीझर लुक आणि १८ जानेवारीला पोस्टर रिलीज केल्यानंतर आता ‘टोटल धमाल’च्या प्रदर्शनाची नवीन तारीखही घोषित करण्यात आली आहे.

‘टोटल धमाल’ ला २२ फेब्रुवारीचा मुहूर्त
SHARES

प्रेक्षकांइतकीच बॉलिवुडलाही काही सिनेमांची प्रतीक्षा असते, पण काही कारणांमुळे जेव्हा या सिनेमांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाते, तेव्हा मात्र सर्वांचीच निराशा होते. ‘टोटल धमाल’ या सिनेमाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलंय. गेल्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला अखेर २२ फेब्रुवारीचा मुहूर्त मिळाला आहे.


पोट धरून हसवणारी 'धमाल' सिरीज

‘धमाल’ चित्रपटाच्या सिरीजमधील ‘टोटल धमाल’ हा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी २००७ मध्ये ‘धमाल’ आणि २०११ मध्ये ‘डबल धमाल’ हे सिनेमे रिलीज झाले आहेत. या दोन्ही सिनेमांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. त्यामुळे सर्व जण ‘टोटल धमाल’ची आतुरतेने वाट पाहात होते, पण काही ना काही कारणांमुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जात होती.


प्रदर्शनाची नवीन तारीख

‘टोटल धमाल’ हा सिनेमा गेल्यावर्षी ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता; परंतु व्हीएफएक्सचं काम वाढल्याचं कारण सांगत प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर १४ जानेवारीला टीझर लुक आणि १८ जानेवारीला पोस्टर रिलीज केल्यानंतर आता ‘टोटल धमाल’च्या प्रदर्शनाची नवीन तारीखही घोषित करण्यात आली आहे.


मल्टीस्टारर 'टोटल धमाल'

फाॅक्स स्टार स्टुडिओज, अजय देवगण फिल्म्स, अशोक ठाकरीया, इंद्र कुमार, श्री. अधिकारी ब्रदर्स, आनंद पंडीत यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाची सहनिर्मिती संगीता आहिर आणि कुमार मंगत पाठक यांनी केली आहे. या सिनेमात अजय देवगण, अनिल कपूर, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, ईशा गुप्ता, माधुरी दीक्षित, बोमण ईराणी, संजय मिश्रा, महेश मांजरेकर, विजय पाटकर, जानी लिव्हर इत्यादी कलाकारांच्या भूमिका आहेत. याशिवाय सोनाक्षी सिन्हावर चित्रीत करण्यात आलेलं ‘मुंगडा…’ हे आयटम साँगही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केलं आहे.


हेही वाचा -

Movie Review : जीवनाचं सूत्र सांगणारा रहस्यपट

मराठी सिनेमाच्या पोस्टरवरही क्लॅाथलेस हिरो!संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा