मराठी सिनेमाच्या पोस्टरवरही क्लॅाथलेस हिरो!

संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटाचं फर्स्ट लुक पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे. पोस्टरमध्ये सिनेमातला मुख्य अभिनेता अभय महाजन निर्वस्त्रपणे कमरेला ट्यूब टायर लावून रस्त्यावरून धावताना दिसतो.

मराठी सिनेमाच्या पोस्टरवरही क्लॅाथलेस हिरो!
SHARES

पोस्टरवर सुटा-बुटातला किंवा फॅन्सी गेटअपमधला हिरो दाखवण्याची परंपरा दिग्दर्शक राजकुमार हिरानींच्या 'पीके' या चित्रपटाने मोडीत काढली. हिरानींनी चक्क आमिर खानला पोस्टरवर कपड्यांविना सादर करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मराठी दिग्दर्शक संजय जाधवनेही आपल्या आगामी चित्रपटाचं पोस्टर सादर केलं आहे.


अपारंपारिक सरप्रायजेस 

संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटाचं फर्स्ट लुक पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे. पोस्टरमध्ये सिनेमातला मुख्य अभिनेता अभय महाजन निर्वस्त्रपणे कमरेला ट्यूब टायर लावून रस्त्यावरून धावताना दिसतो. मराठी सिनेमाच्या इतिहासात हिरोचा असा पहिल्यांदाच परिचय होताना दिसत आहे.

नायकाचा पोस्टरवरील फोटो ही कथानकाची आणि चित्रपटातील प्रसंगाची गरज असल्याचं सांगत संजय म्हणाला की, 'लकी' ही आजच्या तरूणाईची कथा आहे. आजचे तरूण बिनधास्त आणि स्वच्छंदी आहेत. त्यांची एकमेकांशी बोलण्याची भाषा खूप मोकळी-ढाकळी आहे. ते परंपरांगत काहीच करत नाहीत. त्यामुळे 'लकी'मध्येही तुम्हाला अशी अपारंपारिक सरप्रायजेस मिळतील.


मनोरंजक फिल्म 

'एम एस धोनी' आणि 'फ्लाइंग जाट' या सुपरहिट सिनेमांची निर्मिती करणारे बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे संचालक सूरज सिंग 'लकी' सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीत निर्माते म्हणून पाऊल ठेवत आहे. या पोस्टरबद्दल सिंग म्हणाले की, आज मराठी सिनेमा कात टाकत आहे. आजचा मराठी सिनेमा तरूणांवरचा असल्यानं भविष्यात असे अनेक सुखद आश्चर्याचे धक्के मिळणार आहेत. संजय जाधव निखळ मनोरंजनासाठी लोकप्रिय आहेत, त्यामुळे त्यांच्या धाटणीची मनोरंजक फिल्म आम्ही घेऊन येत आहोत.


मजेशीर कथा

पोस्टरवर झळकणाऱ्या अभिनेता अभय महाजननेही आपलं मत व्यक्त केलं आहे. याबद्दल तो म्हणाला की, लकी या तरूणाची ही एक मजेशीर कथा आहे. या सिनेमात मी अशा अनेक अनकन्वेशनल गोष्टी पहिल्यांदाच केल्या आहेत. संजय जाधवांच्या सिनेमाचा हिरो असणं ही खूप भारी गोष्ट आहे. त्याहूनही भारी गोष्ट असते, ती म्हणजे त्या हिरोची लक्षवेधी एन्ट्री. या चित्रपटाचा नायक बनण्याची संधी मिळाल्याने स्वत:ला खूप लकी समजत असल्याचंही अभय म्हणाला. या चित्रपटात अभयसोबत दिप्ती सती मुख्य भूमिकेत आहेत.हेही वाचा - 

कॅाम्प्लिकेटेड ट्राएंगल लव्ह स्टोरी 'रेडीमिक्स'

दिग्गज अभिनेत्रींना मानवंदना देणार ‘नूतन आणि वहिदा’
संबंधित विषय