Advertisement

दिग्गज अभिनेत्रींना मानवंदना देणार ‘नूतन आणि वहिदा’


दिग्गज अभिनेत्रींना मानवंदना देणार ‘नूतन आणि वहिदा’
SHARES

आजवर बऱ्याच अभिनेत्रींनी आपला एक वेगळा ठसा जपत पुढच्या पिढीकडे अभिनयाचा वारसा सोपवला आहे. आपल्या बहारदार अदाकारीने ब्लँक अँड व्हाइटच्या जमानाही रंगीन करणाऱ्या भूतकाळातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये नूतन आणि वहिदा रेहमान ही नावंही सामील आहेत. नूतन आणि वहिदा रेहमान यांना मानवंदना देणारा ‘नूतन आणि वहिदा’ हा कार्यक्रम रसिकांच्या भेटीला येणार आहे.


१२ जानेवारीला कार्यक्रम

स्वर्गीय सौंदर्य आणि संयत अभिनयाने भारतीय सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ‘नूतन आणि वहिदा’ या अभिनेत्रींनी हिंदी रुपेरी पडदा गाजवला. या गुणी अभिनेत्रींच्या कारकिर्दीला मानवंदना देण्यासाठी प्रसाद फणसे आणि नवरस आर्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १२ जानेवारी रोजी मिनी थिएटर, रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे रात्रौ ८.०० वाजता ‘नूतन आणि वहिदा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


प्रथम येणाऱ्यास प्राधान्य 

या कार्यक्रमात या दोन्ही शालीन अभिनेत्रींच्या अभिनय कारकिर्दीचा आढावा अनोख्या रूपात घेतला जाणार आहे. सोबत राधिका फणसे आणि सहकारी नृत्यरूपाने या नायिकांना मानवंदना देणार आहेत. याशिवाय दोन्ही अभिनेत्रींवर चित्रीत झालेल्या काही गाण्यांची झलक दृकश्राव्यातून रसिकांना पहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन प्रसाद फणसे यांची आहे. ज्येष्ठ पत्रकार व हिंदी सिनेसंगीताचे गाढे अभ्यासक अंबरीश मिश्र या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. हा कार्यक्रम सशुल्क असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर आहे.



हेही वाचा - 

रणवीर-आलियाच्या 'गली बॉय'चा ट्रेलर प्रदर्शित

शशांक, मृणाल आणि शर्मिष्ठाची ऑफस्क्रीन धम्माल!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा