Advertisement

शशांक, मृणाल आणि शर्मिष्ठाची ऑफस्क्रीन धम्माल!


शशांक, मृणाल आणि शर्मिष्ठाची ऑफस्क्रीन धम्माल!
SHARES

स्क्रीनवर दिसणारे आपले आवडते कलाकार कॅमेऱ्यामागे कसे असतील? कशा प्रकारे जगत असतील? असे बरेच प्रश्न चाहत्यांना नेहमीच पडत असतात. त्यामुळेच त्यांच्या खासगी आयुष्याबाबत त्यांना नेहमीच कुतूहल असतं. एखाद्या मालिकेतील कलाकार जास्तीत जास्त वेळ सेटवर एकत्र असतात, तेव्हा ते फावल्या वेळेत काय करत असतील याचं उत्तर 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेच्या सेटवर मिळालं आहे.



बहीण-भावाचं नातं

कलर्स मराठीवरील 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेद्वारे शशांक आणि मृणाल पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ही जोडी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. यासोबतच या मालिकेच्या निमित्ताने शर्मिष्ठा राऊत आणि शशांक केतकरही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या दोघांमधील बहीण-भावाचं नातंही रसिकांना भावत आहे. 


लग्नसराइचे दिवस

सिड आणि संयू यांच्यामधील छोटी मोठी भांडणं, सिडचं संयूला समजवणं, त्यांच्यातील धम्माल मस्तीही चांगलीच वर्क होत आहे. पडद्यामागेही यांची खूप धमाल सुरू असते. मालिकेच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने चोवीस तासातील बराचसा वेळ तिघेही एकत्र असतात. सध्या मालिकांमध्ये लग्नसराइचे दिवस आहेत. 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेमध्येही संयू आणि मिलिंद यांचं लग्न होणार आहे. यादरम्यान मालिकेतील कलाकारांनी शूट सुरू असताना बरीच धम्माल मस्तीही केली. 


तिघांचे पडद्यामागील नातं 

शर्मिष्ठा लग्नाच्या भागासाठी खूप सुंदर तयार झाली आहे. तिने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी, खोपा, नथ, मेखला घातला आहे. अनु म्हणजेच मृणाल दुसानीसही तिच्या भुमिकेहून जरा वेगळी दिसत आहे. कारण तिने देखील शर्मिष्ठासोबत मस्त गॅागल घालून फोटो काढला आहे. सिध्दार्थ, अनु आणि संयू यांचा बाईकवरील फोटोही खूपच सुंदर आहे. या तिघांचे पडद्यामागील नातं किती सुंदर आहे आणि ते किती धम्माल मस्ती करतात हे या फोटोवरून समजतं.



हेही वाचा - 

बॉलिवूडमधील दिग्गजांच्या उपस्थितीत 'मराठी तारका'ची एकादशवर्षपूर्ती

'कुटुंब रंगलय काव्यात' चा ३००० वा प्रयोग




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा