Advertisement

बॉलिवूडमधील दिग्गजांच्या उपस्थितीत 'मराठी तारका'ची एकादशवर्षपूर्ती

सियाचिनपासून अंदमानपर्यंत आणि दुबईपासून अमेरिकेपर्यंत पोहोचलेल्या 'मराठी तारका' या कार्यक्रमानं ११ वर्षं पूर्ण केली आहेत. याचं औचित्य साधत निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर यांची संकल्पना आणि निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाचा विशेष सोहळा १३ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता मुंबईतील वर्सोवा मेट्रो स्टेशनजवळच्या मैदानात रंगणार आहे.

बॉलिवूडमधील दिग्गजांच्या उपस्थितीत 'मराठी तारका'ची एकादशवर्षपूर्ती
SHARES

'मराठी तारका' हा मराठी चित्रपटसृष्टीतील एकमेव असा कार्यक्रम आहे ज्यात सहभागी होण्यासाठी जुन्या-नव्या पिढीतील सर्वच तारका आतुरलेल्या असतात. रेखापासून जयाप्रदापर्यंत आणि आशा काळेंपासून माधुरी दीक्षितपर्यंत सर्वच तारकांनी हजेरी लावलेला 'मराठी तारका' अकराव्या वर्षात पोहोचला आहे.


११ वर्षं पूर्ण 

सियाचिनपासून अंदमानपर्यंत आणि दुबईपासून अमेरिकेपर्यंत पोहोचलेल्या 'मराठी तारका' या कार्यक्रमानं ११ वर्षं पूर्ण केली आहेत. याचं औचित्य साधत निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर यांची संकल्पना आणि निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाचा विशेष सोहळा १३ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता मुंबईतील वर्सोवा मेट्रो स्टेशनजवळच्या मैदानात रंगणार आहे. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.


५०० शोज 

मागील ११ वर्षांपासून मराठी अभिनेत्रींचा सहभाग असलेल्या 'मराठी तारका' या गीत-संगीत-नृत्याच्या कार्यक्रमाने तमाम मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांची दादही मिळवली आहे. मराठी अभिनेत्रींना ग्लॅमर मिळवून देणारा हा कार्यक्रम दुबई, अमेरिका, लंडन आणि भारतभरात मिळून ५०० हून अधिक शोज झाले आहेत. त्याशिवाय २००८ मध्ये राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची उपस्थितीही लाभली होती. कला क्षेत्रातील पं. बिरजू महाराज, रेखा, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, वहिदा रेहमान, शोभा डे यांच्यासह माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही हा कार्यक्रम पाहिला आहे. आतापर्यंत सहा पिढ्यांमधील अभिनेत्रींनी मराठी तारका या कार्यक्रमात नृत्यकला सादर केली आहे आणि करीत आहेत


२ कोटींचा निधी 

मराठी भाषा, संगीत, संस्कृतीला या कार्यक्रमातून जगापुढे मांडताना सामाजिक भानही राखलं आहे. म्हणून बॉर्डरवरील जवानांसाठी मोफत हा कार्यक्रम सादर करण्यात आला. तर पोलीस कल्याण निधीसाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून २ कोटींचा निधी जमवण्यात हातभार लावला. त्यामुळे ११ वर्षांच्या टप्प्यावर आलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या प्रेमाच्या जोरावर असाच एक तप, द्विदशकपूर्तीचीही वाटचाल करेल अशी आशा महेश टिळेकर यांनी व्यक्त केली आहे.



हेही वाचा - 

'कुटुंब रंगलय काव्यात' चा ३००० वा प्रयोग

असंतोषाविरोधात मराठीतील दिग्गजांचा 'आसूड'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा