Advertisement

असंतोषाविरोधात मराठीतील दिग्गजांचा 'आसूड'

शेतकऱ्याच्या याच विदारक परिस्थितीवर 'आसूड' या चित्रपटाद्वारे प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. अॅक्शन आणि इमोशन्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या आणि सरकारी यंत्रणा यावर ज्वलंत टीका करणारा आणि डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा हा राजकीय थरारपट 'आसूड'च्या रूपात ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

असंतोषाविरोधात मराठीतील दिग्गजांचा 'आसूड'
SHARES

मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच वास्तववादी आणि ज्वलंत विषयांना प्राधान्य देत समाजातील वास्तव चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. याच कारणांमुळे केवळ देशातच नव्हे, तर विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्येही मराठी चित्रपटांचा डंका कायम वाजत असतो. शीर्षकापासून आशय-विषयापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये नवीन्य जपत मसालेपटांसोबतच काही वास्तववादी मराठी चित्रपटांनीही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. याच वाटेने जात 'आसूड' हा चित्रपट सर्वसामान्यांच्या मनातील असंतोष पडद्यावर सादर करणार आहे. 


 दिग्गज कलाकारांची फौज

मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी ओळखले जातात. एखाद्या विषयाला योग्य न्याय देणाऱ्या अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज हे मराठी चित्रपटसृष्टीचं वैभव आहे. मराठीच्या जोडीला हिंदी चित्रपटांमध्येही मराठमोळ्या कलाकारांच्या अभिनय सामर्थ्याची चुणूक पहायला मिळत आहे. 'आसूड' या आगामी मराठी चित्रपटातून मराठीतही अशीच दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.


दोन नवे चेहरे

विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंत यांच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारे राणा जंगबहादूर, अवतार गील हे नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत हे दोन नवे चेहरे या चित्रपटात झळकणार आहेत. अन्नदाता शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, पण सद्यस्थिती खूप वेगळी आहे. हाच शेतकरी आज अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जगत आहे. त्याच्यासाठी निर्माण केलेल्या योजना, सोयी-सुविधा आज त्याचापर्यंत पोहोचतच नाही. 


८ फेब्रुवारीला प्रदर्शित

शेतकऱ्याच्या याच विदारक परिस्थितीवर 'आसूड' या चित्रपटाद्वारे प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. अॅक्शन आणि इमोशन्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या आणि सरकारी यंत्रणा यावर ज्वलंत टीका करणारा आणि डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा हा राजकीय थरारपट 'आसूड'च्या रूपात ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन निलेश जळमकर तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचं आहे. कथापटकथा आणि संवाद जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केलं असून, संकलन सचिन कानडे यांचं आहे.



हेही वाचा - 

शीतल-सोनियाची 'युथ ट्यूब' गट्टी

मोबाइल प्रेमींचं लक्ष वेधणार ‘व्हॉट्सॲप लव’!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा