Advertisement

मोबाइल प्रेमींचं लक्ष वेधणार ‘व्हॉट्सॲप लव’!

व्हॉट्सॲप हा सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. केवळ व्हॉट्सॲप वरून सर्वांशी संपर्कात राहाता येत असल्याने युवकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेत. व्हॉट्सॲपवरून आलेल्या संदेशातील भावभावनांचा ओलावा किंवा शब्दांमागील भावार्थ ज्याच्या त्याच्या समजण्यावर अवलंबून असतो.

मोबाइल प्रेमींचं लक्ष वेधणार ‘व्हॉट्सॲप लव’!
SHARES

काही सिनेमे शीर्षकांमुळे चर्चेत येत असतात. आजचं युग मोबाइल आणि सोशल मीडियाचं असल्याने एखाद्या सिनेमाच्या शीर्षकाची सांगड या गोष्टींशी निगडीत घातली गेली तर ते लक्षवेधी बनतं. याच कारणामुळे ‘व्हॉट्सॲप लव’ हा चित्रपटही मोबाइलधारकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरणार असं म्हणायला हरकत नाही.


प्रेमाची कथा 

काही वर्षांपूर्वी म्हणजेच सोशल मीडियाच्या सुरुवातीच्या काळात आॅर्कुटच्या माध्यमातून प्रेम व्हायचं. नंतर ही जागा फेसबुक आणि ट्विटरने घेतली. यात ‘व्हॅट्सअप’चाही मोलाचा वाटा आहे. ‘व्हॉट्सॲप लव’ हा चित्रपट कदाचित अशाच काहीशा प्रेमाची कथा सांगणारा असावा असा प्राथमिक अंदाज या चित्रपटाच्या शीर्षकावरून लावता येतो.


टीजर मोशन पोस्टर 

‘व्हॉट्सॲप लव’ या सिनेमाचा नुकताच पहिला टीजर मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. पोस्टर आणि शीर्षक पाहून सिनेमाचा प्रकार जुजबी लक्षात येत असल्याने, विषयाबाबत सर्वच वयोगटातील स्त्री-पुरूष व्हॉट्सॲप युजर्समध्ये जास्तच उत्सुकता निर्माण झाली आहे. ज्येष्ठांना किंवा आई-बाबांना वाटेल की, हा सिनेमा व्हॉट्सॲपवरून जुळलेल्या प्रेमसंबंधांवर आधारीत असेल. तरुणाईला वाटेल की, चॅटींग पार्टनरबरोबर असलेल्या बाँडींगला हे ‘व्हॉट्सॲप लव’ म्हणत असतील. काही म्हणा, चित्रपटाच्या शीर्षकावरून आणि हल्लीच्या कृत्रीम नातेसंबंधामुळे नेमका चित्रपट कशावर भाष्य करेल, हे समजणं कठीण आहे. पण, शीर्षक निश्चितच गमतीदार आहे. सिनेमात कलाकार कोण आहेत हे अजून गुलदस्त्यात असलं तरी प्रदर्शनाची तारीख नमूद करण्यात आल्याने पुढच्या गोष्टी लवकरच समोर येतील.


जीवनाचा अविभाज्य भाग

व्हॉट्सॲप हा सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. केवळ व्हॉट्सॲप वरून सर्वांशी संपर्कात राहाता येत असल्याने युवकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेत. व्हॉट्सॲपवरून आलेल्या संदेशातील भावभावनांचा ओलावा किंवा शब्दांमागील भावार्थ ज्याच्या त्याच्या समजण्यावर अवलंबून असतो. किंबहुना गैरसमज अनेक होतात आणि पुढे प्रसरण पावतात. पण, संपर्क साधणं आणि बंध जुळवणं या व्हॉट्सॲपमुळे सहज शक्य झालं आहे. 


५ एप्रिलला प्रदर्शित

थेट संवाद साधण्यासाठी न धजावणाऱ्या व्यक्तीलाही आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं अधिक सोपं वाटू लागलं आणि प्रेमही व्यक्त करण्यासाठी हल्ली व्हॉट्सॲप मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे. त्यामुळे प्रेम भावना आणि नातेसंबंधाना शाबूत ठेवण्यासाठी माध्यम ठरलेले ‘व्हॉट्सॲप’ सिनेमाचा विषय बनलं आहे. देश-विदेशातील बड्या कलाकारांच्या संगीतरजनींचे आयोजक हेमंतकुमार महाले यांची कथा, निर्मिती आणि दिग्दर्शित असलेला ‘व्हॉट्सॲप लव’ ५ एप्रिल रोजी सर्वांच्या भेटीला येणार आहे.



हेही वाचा - 

'डोंबिवली रिटर्न'साठी प्रथमच एकत्र आले संदीप-राजेश्वरी

Movie Review- असे पुलं होणे नाही




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा