Advertisement

'डोंबिवली रिटर्न'साठी प्रथमच एकत्र आले संदीप-राजेश्वरी

संदीप आता निर्माता बनला असून बहुचर्चित 'डोंबिवली फास्ट' या चित्रपटाचा पुढील भाग घेऊन येत आहे. 'डोंबिवली रिटर्न - जे जातं... तेच परत येतं?' या चित्रपटाची निर्मिती संदीपनं केली आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं.

'डोंबिवली रिटर्न'साठी प्रथमच एकत्र आले संदीप-राजेश्वरी
SHARES

संदीप कुलकर्णी हे नाव आज केवळ मराठीपुरतंच मर्यादित नसून, हिंदीतही चांगलंच पॅाप्युलर आहे. श्याम बेनेगल, सुधीर मिश्रा, मधुर भांडारकर यांसारख्या हिंदीतील ख्यातनाम दिग्दर्शकांसोबत काम करत संदीपनं बरेच पुरस्कारही पटकावले आहेत. संदीप आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून प्रथमच तो अभिनेत्री राजेश्वरी सचदेवसोबतही दिसणार आहे.


संदीप निर्मात्याच्या भूमिकेत

संदीप आता निर्माता बनला असून बहुचर्चित 'डोंबिवली फास्ट' या चित्रपटाचा पुढील भाग घेऊन येत आहे. 'डोंबिवली रिटर्न - जे जातं... तेच परत येतं?' या चित्रपटाची निर्मिती संदीपनं केली आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. या चित्रपटात संदीप आणि राजेश्वरी पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. दोन दिग्गज कलाकार एकत्र आल्यानं प्रेक्षकांना या चित्रपटात अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. २२ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


पोस्टर लाँच

'कंरबोला क्रिएशन्स' या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून संदीपने महेंद्र अटोले, गुरमित सिंग, कपिल झवेरी यांच्या साथीनं 'डोंबिवली रिटर्न'ची निर्मिती केली आहे. 'डोंबिवली फास्ट' या चित्रपटाचं दिग्दर्शन निशिकांत कामतनं केलं होतं. तर 'डोंबिवली रिटर्न'च्या लेखन-दिग्दर्शनाची जबाबदारी महेंद्र तेरेदेसाई यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचं पोस्टर लक्षवेधून घेणारं असून, 'डोंबिवली फास्ट'मधील माधव आपटेची आठवण करून देणारं आहे. या पोस्टरमध्ये कथानकाचा नायक त्याच्या पत्नी आणि मुलीसह उभा आहे. त्या तिघांच्याही चेहऱ्यावरचे भाव अस्वस्थतेचे आहेत. त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या बाबतीत काय घडलं असेल, याचं कुतूहल या पोस्टरमधून निर्माण होतं.


पैसा दु:खाचं मुळ

'पैसा सगळ्या दु:खाचं मुळ आहे', ही म्हण मध्यमवर्गात किती खोलवर रूजलेली आहे, याचं चित्रं उभं करणारा हा चित्रपट आहे. ही कथा आपल्याला मुलुंड-सीएसटीच्या एका प्रवासात सुचल्याचं तेरेदेसाई यांचं म्हणणं आहे. तेरेदेसाई म्हणाले की, संदीपला ही कथा आवडली. आपला पहिला चित्रपट कसा असावा या बाबतीत मी आग्रही होतोनिर्माता म्हणून संदीपनं तो आग्रह पूर्ण केलातो नट म्हणून जितका प्रगल्भ आहेतितकाच निर्माता म्हणूनही आहेखरंतर तो माझा काॅलेजपासूनचा दोस्तआम्ही एकत्र नाटकातून कामं केली होतीनिर्माता म्हणून त्याच्या पहिल्या चित्रपटाचे (प्रेमसूत्रमी संवादही लिहिले होते.


हिंदी, मराठीत

सुरुवातीला हा चित्रपट करताना मला जराही ताण नव्हता. पण जेव्हा तो बाय-लिंग्वल (हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांत) करायचा ठरला तेव्हा थोडं दडपण आलं. कारण या चित्रपटाचा कॅनव्हास खूप मोठा आहे. नावामुळे हा 'डोंबिवली फास्ट'चा सिक्वेल आहे असं वाटेलही. पण यापेक्षा समर्पक दुसरं नाव सुचलंच नाही. उद्या झालीच त्याच्याशी तुलना तरीही बरंच आहे. एका चांगल्या चित्रपटाशी तुलना होणं केव्हाही चांगलंच, असंही तेरेदेसाई म्हणाले.



हेही वाचा -

Movie Review- असे पुलं होणे नाही

बारावीमुळे हुकणार रिंकूच्या 'कागर' चा व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा