बारावीमुळे हुकणार रिंकूच्या 'कागर' चा व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त?

१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने 'कागर' प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, फेब्रुवारीमध्येच रिंकुची बारावीची परीक्षा असल्याने चित्रपटाचं प्रदर्शन पुढं ढकलण्याचा निर्मात्यांनी निर्णय घेतला.

  • बारावीमुळे हुकणार रिंकूच्या 'कागर' चा व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त?
  • बारावीमुळे हुकणार रिंकूच्या 'कागर' चा व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त?
SHARE

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'सैराट' या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला रिंकू राजगुरू ही मराठी मातीतील नायिका दिली. पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या रिंकूने अल्पावधीतच आपला वेगळा चाहता वर्ग तयार केला. रिंकूचे हेच चाहते आता तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत, पण रिंकूची मुख्य भूमिका असलेल्या 'कागर' या आगामी चित्रपटाचा व्हॅलेंटाइन डे चा मुहूर्त हुकणार असल्याची माहिती मिळाली आहे.प्रदर्शन लांबणीवर

पूर्वी हा चित्रपट व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर रसिक दरबारी सादर करण्याचा निर्णय निर्मात्यांच्या मनात होता. पण रिंकू यंदा बारावीला असल्याने त्याचं प्रदर्शन लांबणीवर गेलं आहे. रिंकूच्या बारावीच्या परीक्षेमुळे 'कागर' आता व्हॅलेंटाइन डे ला प्रदर्शित होणार नाही. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ' या संस्थेने 'कागर'ची निर्मिती केली आहे. 'रिंगण' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या दिग्दर्शक मकरंद माने याने 'कागर'चं दिग्दर्शन केलं आहे. 


मकरंद-रिंकू प्रथमच एकत्र

वडील-मुलाच्या नात्यावर आधारित 'रिंगण' आणि चार शाळकरी मुलांची गोष्ट असलेला 'यंग्राड' या दोन चित्रपटांनंतर 'कागर' हा मकरंदचा तिसरा चित्रपट आहे. 'रिंगण' आणि 'यंग्राड' हे दोन्ही चित्रपट भिन्न पद्धतीचे होते. त्यामुळे 'कागर' या चित्रपटाविषयी नावापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. मूळचे अकलूजचे असलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते मकरंद आणि रिंकू या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. 


कागरविषयी उत्सुकता

दोन वर्षांच्या ब्रेकनंतर रिंकूचा चित्रपट येत असल्याने कागरविषयी प्रचंड उत्सुकता आणि चर्चा आहे. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने 'कागर' प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, फेब्रुवारीमध्येच रिंकुची बारावीची परीक्षा असल्याने चित्रपटाचं प्रदर्शन पुढं ढकलण्याचा निर्मात्यांनी निर्णय घेतला असल्याचं निर्माते विकास हांडे आणि सुधार कोलते यांनी स्पष्ट केलं आहे. 


निर्मात्यांचं अाभार

या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करताना रिंकू म्हणाली की, मला स्वतःला 'कागर'विषयी प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने फॅन्सला भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार होती. मात्र, बारावीची परीक्षा असल्याने मला अभ्यासाला वेळ देणं आवश्यक आहे हे निर्मात्यांनी लक्षात घेतलं आणि १४ फेब्रुवारीला माझ्यासाठी चित्रपट प्रदर्शित  करायचा नाही असं ठरवलं. त्यासाठी त्यांचे आभार मानावेसे वाटतात. चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं असलं, तरी लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचंही रिंकू म्हणाली.हेही वाचा- 

निवडणुकीनंतर तुम्हालाच मिळेल भरपूर मोकळा वेळ, अमेय खोपकरांची शेलारांना कोपरखळी

मराठीला एक शो मिळालाच पाहिजे, महेश मांजरेकर यांनी थिएटर मालकांना दटावलं
संबंधित विषय
ताज्या बातम्या