Submitting your vote now...
पॉवर प्लेमध्ये कोणता संघ अधिक धावा करेल?
*One Lucky Winner per match. Read T&C
व्होट केल्याबद्दल धन्यवाद. कृपया तुमची माहिती खाली भरा, म्हणजे तुमच्या संपर्कात रहाणं सोपं होईल.
Enter valid name
Enter valid number

निवडणुकीनंतर तुम्हालाच मिळेल भरपूर मोकळा वेळ, अमेय खोपकरांची शेलारांना कोपरखळी

शेलारांच्या या ट्विटनंतर मनसे नेते-कार्यकर्ते तापले आहेत. राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या शेलारांच्या ट्विटसंदर्भातील 'मुंबई लाइव्ह'च्या बातमीवर प्रतिक्रिया देताना खोपकर यांनी शेलार यांना थोडे दिवस थांबा, निवडणुकीनंतर तुमच्या अख्या पक्षाकडे खूप वेळ असणार आहे आणि तोही पुढची अनेक वर्षे, असं म्हटलं आहे.

SHARE

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महामुलाखतीवर टीका करणारं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं व्यंगचित्र चांगलंचं झोंबल्याने भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज यांच्याकडे भरपूर वेळ आहे, त्यामुळे ते कार्टून काढतात, इतकाच वेळ असेल तर त्यांनी चला हवा येऊ बघायला हरकत नाही असं म्हणत शेलक्या शब्दांत टीका केली. शेलारांच्या या विधानानंतर मनसेचे नेतेही चांगलेच तापले असून त्यांनीही शेलारांना शिंगावर घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. निवडणुकीनंतरची पुढची अनेक वर्षे तुम्हाला भरपूर मोकळा वेळ मिळणार आहे. तेव्हा या रिकामटेकड्या वेळेत काय करायचं याचा विचार आतापासूनच सुरू करा, अशी कोपरखळी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी शेलारांना मारली आहे.


काय केली होती टीका?

शेलार यांनी गुरूवारी ट्विट करत राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला उत्तर दिलं. 'मी'पणा जोपासण्यात जे धन्यता मानतात त्यांना 'प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि शेवटी मी' अशी जीवननिष्ठा असलेल्यांची मुलाखत समजणं थोडं अवघडच असतं असं म्हणत आशिष यांनी राज यांची खिल्ली उडवली. राज यांच्याकडे वेळ असल्यानं ते कार्टून काढतात. त्यांनी 'चला हवा येऊ द्या' बघायला हरकत नाही, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

मिळेल भरपूर वेळ

शेलारांच्या या ट्विटनंतर मनसे नेते-कार्यकर्ते तापले आहेत. राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या शेलारांच्या ट्विटसंदर्भातील 'मुंबई लाइव्ह'च्या बातमीवर प्रतिक्रिया देताना खोपकर यांनी शेलार यांना थोडे दिवस थांबा, निवडणुकीनंतर तुमच्या अख्या पक्षाकडे खूप वेळ असणार आहे आणि तोही पुढची अनेक वर्षे, असं म्हटलं आहे. तेव्हा या रिकामटेकड्या वेळेत काय करायचं याचा विचार करा, असाही प्रतिटोला खोपकर यांनी शेलारांना लगावला आहे.


फिरलेली हवा कळणार नाही

खोपकर यांच्यासह मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही ट्विटमधूनच शेलारांना टार्गेट केलं आहे. मी मी मी चा जप करणाऱ्या बिग बाॅसच्या छायेतून बाहेर या आशिषजी, आम्ही काय बघायचं किंवा काय करायचं हे आमचं आम्ही बघूच. पण तुम्हाला मात्र फिरलेली हवा पण कळणार नाही, असा टोला लगावत भाजपाचा हवा बदलल्याचं म्हटलं आहे. यावर शेलार आणि भाजपा काय उत्तर देत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असून यापुढं सोशल मीडियावर या दोन पक्षातील शाब्दीक चकमक सुरूच राहणार असल्याचंच चित्र आहे.हेही वाचा-

'मॅनेज मुलाखत', राज ठाकरेंची पंतप्रधानांवर टीका

राज ठाकरेंकडे भरपूर वेळ, चला हवा येऊ द्या बघायला हरकत नाही- आशिष शेलार


संबंधित विषय