राज ठाकरेंकडे भरपूर वेळ, चला हवा येऊ द्या बघायला हरकत नाही- आशिष शेलार

राज यांची टीका जिव्हारी लागल्याने भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी गुरूवारी ट्विट करत राज यांना टोला लगावला. राज यांच्याकडे वेळ असल्यानं ते व्यंगचित्र काढतात. त्यामुळे वेळ असेल तर त्यांनी चला हवा येऊ द्या बघायला हरकत नाही, असा खोचक सल्ला शेलारांनी दिला.

SHARE

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने कुंचल्याद्वारे फटकारे देताना दिसताहेत. बुधवारी राज ठाकरे यांनी मोदींच्या महामुलाखतीवर व्यंगचित्रातून टीका केली. ही टीका जिव्हारी लागल्याने भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी गुरूवारी ट्विट करत राज यांना टोला लगावला. राज यांच्याकडे वेळ असल्यानं ते व्यंगचित्र काढतात. त्यामुळे वेळ असेल तर त्यांनी चला हवा येऊ द्या बघायला हरकत नाही, असा खोचक सल्ला शेलारांनी दिला.


सोशल मीडियावर व्हायरल

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदींच्या मुलाखतीची चर्चा होती. मुलाखतीनंतर मात्र ही मुलाखत मॅनेज असल्याची टीका विरोधी पक्षांमधून सुरू झाली. या मुलाखतीवर सामनामधूनही मोठी टीका झाली. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनीही आपल्या कुंचल्यातून या मुलाखतीवर फटकारे मारले. मोदींची मुलाखत ही मोदींनीच घेतलेली होती, हा त्यांच्या व्यंगचित्राचा आशय असल्याने हे व्यंगचित्र सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झालं. त्यामुळे राज यांचं हे व्यंगचित्र भाजपाला चांगलंच झोंबलं.

टीकेला उत्तर

या टीकेला उत्तर देताना शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून राज ठाकरेंवर निशाणा साधला. प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि शेवटी मी अशी जीवननिष्ठा असलेल्यांच्या मुलाखती समजणं हे 'मी'पणा जोपसणाऱ्यांसाठी अवघड असतं. मुळात वेळ असल्यानं कार्टून काढलं जातं. त्यामुळे वेळ असेलच, तर चला हवा येऊ द्या बघायला हरकत नाही, अशा खोचक शब्दांत शेलार यांनी ट्विट केलं आहे.हेही वाचा-

'मॅनेज मुलाखत', राज ठाकरेंची पंतप्रधानांवर टीका

निवडणुकीच्या तयारीला लागा; अमित शाह यांचे महाराष्ट्रातील खासदारांना आदेशसंबंधित विषय
ताज्या बातम्या