Advertisement

'मॅनेज मुलाखत', राज ठाकरेंची पंतप्रधानांवर टीका

पंतप्रधानांची मुलाखत म्हणजे स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारल्यासारखी होती, असं दर्शवत या 'मॅनेज' मुलाखतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून टीका केली आहे.

'मॅनेज मुलाखत', राज ठाकरेंची पंतप्रधानांवर टीका
SHARES

तब्बल ४ वर्षे प्रसार माध्यमांशी 'सेफ डिस्टन्स' ठेवल्यानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'एएनआय' या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. ही मुलाखत इतर वृत्तवाहिन्यांनी जशीच्या तशी चालवली. परंतु ही मुलाखत म्हणजे स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारल्यासारखी होती, असं दर्शवत या 'मॅनेज' मुलाखतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून टीका केली आहे.


स्वत:चाच डंका

राज यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात प्रश्न विचारणारी व्यक्ती अर्थात मुलाखतकार आणि उत्तर देणारी व्यक्ती एकच म्हणजे पंतप्रधान मोदी यांना दाखवण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी स्वत: लाच 'बोला काय विचारू' असा प्रश्न करत आहेत. या व्यंगचित्राला राज यांनी 'एक मनमोकळी मुलाखत' असं नाव दिलं आहे. ''एका वृत्तवाहिनीने नरेंद्र मोदी यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली'' असं नमूद करताना राज यांनी मोदी यांच्या विविध प्रतिमा दाखवत ते स्वत: चाच डंका मिरवत असल्याचं दर्शवलं आहे.

सर्व विषयांना स्पर्श

मोदी यांनी एएनआयच्या संपाद स्मिता प्रकाश यांना ९५ मिनिटे मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जीएसटी, काळापैसा, सर्जिकल स्ट्राइक, राफेल, नोटाबंदी, उर्जित पटेल, राम मंदिर, तीन राज्यांतील पराभव यासहित गांधी घराण्याविषयी आपली मतं मांडली. सोबतच २०१९ मध्ये भाजपा पुन्हा एकदा केंद्रात सत्ता स्थापन करेल, असा दावाही केला.


सोयीचे प्रश्न

परंतु ही मुलाखत पूर्णपणे मॅनेज होती. मुलाखतीचे प्रश्न आधीपासूनच ठरले होते. पंतप्रधानांनी आपल्या सोयीचे प्रश्न काढून त्यावर उत्तरं दिली. मुख्य धारेतील इतर वृत्तवाहिन्यांना मुलाखत देण्याऐवजी त्यांनी वृत्तसंस्थेला मुलाखत देऊन 'सेफ गेम' खेळल्याची टीका काँग्रेससह शिवसेनेही केली.हेही वाचा-

राज ठाकरे मच्छिमारांच्या पाठिशी, समस्या सोडवा नाहीतर, काम बंद पाडू, मनसेचा इशारा

मोदी, शहांच्या मुजोरीला उत्तर- राज ठाकरेRead this story in English
संबंधित विषय
Advertisement