Advertisement

निवडणुकीच्या तयारीला लागा; अमित शाह यांचे महाराष्ट्रातील खासदारांना आदेश

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह सर्व राज्यातील भाजपा खासदारांची बैठक घेणार आहेत. त्यानुसार पहिली बैठक बुधवारी दिल्लीतील महाराष्ट्र सदन इथं महाराष्ट्रातील खासदारांची पार पडली. ही बैठक वादळी ठरल्याची माहिती समोर येत आहे.

निवडणुकीच्या तयारीला लागा; अमित शाह यांचे महाराष्ट्रातील खासदारांना आदेश
SHARES

लोकसभा निवडणूक आता जवळ येत असतानाही युतीचा प्रश्न जैसे थे आहे. शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न गेल्या कित्येक महिन्यांपासून भाजपाचा सुरू आहे. पण शिवसेना काही मानायला तयार नाही. त्यामुळे आता शिवसेनेच्या प्रतिसादाची वाट न पाहता महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व जागा लढण्याच्यादृष्टीनं तयारीला लागा, असे आदेश भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी महाराष्ट्रातील भाजपाच्या खासदारांना बुधवारी दिले आहेत.


दिल्लीत बैठक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह सर्व राज्यातील भाजपा खासदारांची बैठक घेणार आहेत. त्यानुसार पहिली बैठक बुधवारी दिल्लीतील महाराष्ट्र सदन इथं महाराष्ट्रातील खासदारांची पार पडली. ही बैठक वादळी ठरल्याची माहिती समोर येत आहे. प्रामुख्यानं या बैठकीत युतीवर चर्चा झाल्याचीही माहिती पुढं येत आहे. महाराष्ट्रात काही गमवून युती करायची नाही अशी भूमिका घेत सर्वच्या सर्व ४८ जागा लढवण्याची तयारी शाह यांनी दाखवली आहे. तर त्यादृष्टीने तयारीला लागण्याचे आदेशही त्यांनी राज्यातील भाजपाच्या खासदारांना दिले आहेत. प्रत्येक खासदाने आपापल्या मतदारसंघात जावं, मतदारांना अधिकाधिक वेळ द्यावा असे आदेशही त्यांनी दिले आहेत.


धनगर आरक्षणावरही चर्चा 

लोकसभा निवडणुकीसह या बैठकीत धनगर आरक्षणावरही चर्चा झाली. धनगर आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनला आहे. धनगर समाजात सध्या मोठी नाराजी आहे. या नाराजीचा फटका आगामी निवडणुकीत बसू शकतो, असं म्हणत धनगर आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करण्याची गरज असल्याची विनंती यावेळी खासदारांनी शाह यांच्याकडे केल्याचीही चर्चा आहे. हेही वाचा - 

'मॅनेज मुलाखत', राज ठाकरेंची पंतप्रधानांवर टीका
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement