Advertisement

शीतल-सोनियाची 'युथ ट्यूब' गट्टी

'लाखात एक माझा फौजी' असं म्हणत घराघरात पोहोचलेली शीतली म्हणजेच शिवानी बावकर आणि 'तुला पाहते रे' या मालिकेतून स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण अंदाजाने अल्पावधीत लोकप्रिय झालेली सोनिया अर्थातच पूर्णिमा डे या दोघी लवकरच एकत्र चित्रपटात झळकणार आहेत.

शीतल-सोनियाची 'युथ ट्यूब' गट्टी
SHARES

प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांसाठी काही ना काही तरी नवीन घेऊन येत असतो. यात कथानक तर असतंच, पण कित्येकदा नवोदित कलाकारांच्या जोड्याही प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरतात. अशातच टेलिव्हीजनच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले दोन कलाकार एकाच चित्रपटात पहायला मिळणार असतील तर त्यांच्या चाहत्यांसाठी ती मोठी पर्वणीच ठरते. महाराष्ट्राच्या लाडक्या शीतल आणि सोनिया यांची 'युथ ट्यूब' गट्टी लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.


एकत्र चित्रपटात झळकणार

'लाखात एक माझा फौजी' असं म्हणत लागिरं झालं जी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शीतली म्हणजेच शिवानी बावकर आणि 'तुला पाहते रे' या मालिकेतून स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण अंदाजाने अल्पावधीत लोकप्रिय झालेली सोनिया अर्थातच पूर्णिमा डे या दोघी लवकरच एकत्र चित्रपटात झळकणार आहेत. मिरॅकल्स फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या 'युथट्यूब' या आगामी मराठी चित्रपटात त्यांच्या मैत्रीचा अनोखा अंदाज बघायला मिळणार आहे. १ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


३०० फ्रेश चेहरे

आजच्या धावपळीच्या काळात सर्वांचीच जीवनशैली खूप बदलली आहे. पिढीनुरूप तरुणाईच्या जीवनशैलीत कमालीचा बदल झाला आहे. तरुणाईची बदलती जीवनशैली, सोशल मिडियाच्या आहारी गेल्याने त्यांच्यातील हरवत चाललेला संवाद या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन सात तरुण- तरुणींची कथा 'युथट्यूब' या सिनेमात मांडण्यात आली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन प्रमोद प्रभुलकर यांनी केलं असून, प्रमोद आणि मधुराणी प्रभुलकर संचालित मिरॅकल्स अॅक्टिंग अॅकॅडमीतले ३०० फ्रेश चेहरे या चित्रपटात झळकणार आहेत. शिवानी आणि पूर्णिमा दोघीही मिरॅकल्स अॅक्टिंग अॅकॅडमीच्या विद्यार्थिनी आहेत.


पंकज पडघन यांचं संगीत

प्रमोद प्रभुलकर लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित 'युथट्यूब' या चित्रपटाचं छायांकन सचिन गंडाकुश तर संकलन प्रमोद काहार यांचं आहे. कलादिग्दर्शन संजय कांदेकर यांनी केलं आहे. रंगभूषा सौरभ कापडे यांची, तर रंगभूषा मधुराणी प्रभुलकर यांची आहे. संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी पंकज पडघन यांनी सांभाळली आहे. मधुराणी प्रभुलकर, सायली केदार, शिल्पा देशपांडे यांनी लिहिलेल्या गीतांना सायली पंकज शिखा जैन, आर्या आंबेकर, सागर फडके यांनी स्वरबद्ध केलं आहे.



हेही वाचा - 

मोबाइल प्रेमींचं लक्ष वेधणार ‘व्हॉट्सॲप लव’!

Movie Review- असे पुलं होणे नाही




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा