Advertisement

कॅाम्प्लिकेटेड ट्राएंगल लव्ह स्टोरी 'रेडीमिक्स'


कॅाम्प्लिकेटेड ट्राएंगल लव्ह स्टोरी 'रेडीमिक्स'
SHARES

प्रेम हा दिग्दर्शकांचा नेहमीचाच आवडता विषय आहे. प्रेमकथा म्हणजे थोडं कन्फ्युजन, थोडा उशीर, थोडी अस्थिरता, थोडी चंचलता... आणि बरंच काही. या एकाच विषयावर आधारित आजवर असंख्य सिनेमे येऊन गेले असले तरी दिग्दर्शकांवर असलेली या विषयाची मोहिनी कमी झालेली नाही. आता प्रेक्षकांच्या भेटीला आणखी एक प्रेमकथा येणार आहे. या चित्रपटाचं शीर्षक आहे 'रेडीमिक्स'.


टिझर प्रदर्शित 

अमेय खोपकर यांच्या एव्हीके फिल्म्स प्रस्तुत आणि कृती फिल्म्स, सोमिल क्रिएशन्स निर्मित 'रेडीमिक्स'मध्ये प्रेक्षकांना एक कॅाम्प्लिकेटेड लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. शेखर ढवळीकर लिखित व जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'रेडीमिक्स'चा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. आजचा आघाडीचा युथ आयकॉन वैभव तत्त्ववादी, प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात आहेत. या तिघांवरच 'रेडीमिक्स'चा टीझर चित्रीत करण्यात आला आहे.


मोजक्या शब्दांत वर्णन

अभिनेते सचिन खेडेकर यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजातील मोजक्या शब्दांत अगदी खुमासदार शैलीत 'रेडीमिक्स'मधील मुख्य व्यक्तिरेखांचं वर्णन आणि स्वभावविशेष कथन केले आहेत. कलाकारांच्या व्यक्तिरेखा नेमक्या कशा आहेत? आणि चित्रपटाचा 'पोत' काय आहे? हे टीझर पाहिल्यावर समजतं. मोजक्या दृश्यांतून अचूक शब्दांच्या आधारे या चित्रपटाचा टीझर बनवण्यात आला आहे. 


इंटिरियर डेकोरेटरची कथा

जालिंदर कुंभार यांनी 'रेडीमिक्स'मध्ये समीर चिटणीस नावाच्या एका तरुण इंटिरियर डेकोरेटरच्या आयुष्याची गोड कथा मांडली आहे. त्याच्या आयुष्यात नुपूर ही सुंदर तरुणी येते आणि त्यानंतर त्याचं आयुष्य रोमँटिक वळण घेतं. वैभव, प्रार्थना आणि नेहा हे त्रिकूट प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी सज्ज झालं आहे. त्यांच्या जोडीला अभिनेते सुनिल तावडे, आनंद इंगळे, नेहा शितोळे, गिरीश परदेसी, आशा पाटील, रमा नाडगौडा, अश्विनी कुलकर्णी, उदय नेने, राजू बावडेकर, आशिष गोखले इत्यादी कलाकार आहेत.

लिंक - https://www.youtube.com/watch?v=ROcF6XMWBzI



हेही वाचा - 

दिग्गज अभिनेत्रींना मानवंदना देणार ‘नूतन आणि वहिदा’

रणवीर-आलियाच्या 'गली बॉय'चा ट्रेलर प्रदर्शित




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा