Advertisement

‘रॉकेट्री’साठी माधवन बनला दिग्दर्शक !

नेहमीच विविधांगी भूमिका साकारत लक्ष वेधून घेणारा अभिनेता आर. माधवन आता एका du-rh रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे. आजवर केवळ कॅमेऱ्यासमोर वावरणारा माधवन सध्या पडद्यामागे राहूनही काम करत असून, दिग्दर्शनाच्या कामात व्यग्र आहे.

‘रॉकेट्री’साठी माधवन बनला दिग्दर्शक !
SHARES

नेहमीच विविधांगी भूमिका साकारत लक्ष वेधून घेणारा अभिनेता आर. माधवन आता एका du-rh रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे. आजवर केवळ कॅमेऱ्यासमोर वावरणारा माधवन सध्या पडद्यामागे राहूनही काम करत असून, दिग्दर्शनाच्या कामात व्यग्र आहे.




चित्रपटाच्या कामात बिझी 

मागील काही दिवसांपासून माधवन 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' या चित्रपटाच्या कामात बिझी असल्याच्या बातम्या येत आहेत. या सिनेमात तो शीर्षक भूमिका म्हणजेच शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांची भूमिका साकारत असल्याचं यावरून लक्षात येत होतं, पण आता मिळालेल्या माहितीवरून तो या सिनेमाचं दिग्दर्शनही करत असल्याचं समजतं. खरं तर 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' हा सिनेमा अगोदर अनंत महादेवन दिग्दर्शित करत होते, पण आधीच्या कमिटमेंट्स पूर्ण न झाल्याने त्यांना हा सिनेमा सोडावा लागल्याची माहिती मिळाली आहे.


शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांच्या कारकिर्दीवर आधारित

महादेवन यांनी अंग काढून घेतल्यावर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी माधवनकडे आल्याचं समजतं. हा चित्रपट भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांच्या कारकिर्दीवर आधारित आहे. माधवनने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यावरून या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी माधवनकडे सोपवण्यात आल्याचं समजतं.


नवीन जबाबदारी

सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. माधवनने शेअर केलेल्या फोटोत सिनेमाची पाटी असून, त्यात दिग्दर्शक म्हणून त्याचं नाव आहे. या फोटोसोबत आपल्या भावना व्यक्त करत त्याने चाहत्यांकडून आशीर्वाद आणि प्रेमाची गरज असल्याचं म्हटलं आहे. महादेवन यांच्याकडून आपल्याकडे दिग्दर्शनाची धुरा आल्याबाबत माधवन म्हणाला की, महादेवन खूप चांगले दिग्दर्शक आहेत. आता नवीन जबाबदारीसह नंबी नारायणन यांची कथा सांगण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही माधवन म्हणाला.


विविध भाषेत होणार प्रदर्शित

या सिनेमाचे वास्तवातील नायक नंबी नारायणन यांच्याबाबत सांगातचं तर ते इस्त्रोमधील एक ख्यातनाम शास्त्रज्ञ होते. १९९४ मध्ये हेरगिरी प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. भारतीय अंतराळ योजनेसंदर्भातील गोपनीय दस्तऐवज परकीयांच्या स्वाधीन केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. आता या चित्रपटाच्या माध्यमातून नारायणन यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. हा सिनेमा तमिळ, तेलुगू, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा -

श्रीया पिळगावकर बनली 'तेजस्वी चेहरा'

चैतन्य देवढेचं पहिलं गाणं रिलीज !



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा