श्रीया पिळगावकर बनली 'तेजस्वी चेहरा'

‘महागुरू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची कन्या श्रीया हिने नुकताच ‘झी युवा तेजस्वी सन्मान’ पटकावला आहे.

SHARE

प्रेक्षकांप्रमाणेच सिनेसृष्टीचंही स्टार किड्सच्या परफार्मंसकडे बारीक लक्ष असतं. त्यामुळेच एखाद्या कलाकार-तंत्रज्ञाचं मूल धडाकेबाज कामगिरी करत पुरस्कार पटकावतं तेव्हा सर्वांनाच त्याचं कौतुक वाटतं. तसंच काहीस झालं ते श्रीयाच्या बाबतीत. ‘महागुरू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची कन्या श्रीया हिने नुकताच ‘झी युवा तेजस्वी सन्मान’ पटकावला आहे.

विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय आणि अनुकरणीय कार्य करणाऱ्या युवकांना ‘झी युवा सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. यंदाचा ‘झी युवा सन्मान’ सोहळा श्रीयासाठी खास ठरला आहे. या सोहळ्यात श्रीयाने 'तेजस्वी चेहरा' या सन्मानाने गौरवण्यात आल्याचं पाहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम 'झी युवा' वर रविवार २० जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता दाखवण्यात येईल.


‘तू तू मैं मैं’ मध्येच चुणूक होती दाखवली

मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालेल्या श्रीयाने वयाच्या ५ व्या वर्षांपासूनच कॅमेरा फेस करायला सुरुवात केली. बालपणी तिने अपल्या वडीलांच्याच ‘तू तू मैं मैं’ या मालिकेत बिट्टूची भूमिका यशस्वीपणे साकारत आपले मनसुबे स्पष्ट केले होते. लहानपणापासूनच तिला अभिनयाचं बाळकडू मिळालं असलं तरी, तिने स्वबळावर भारतातसोबतच आंतराष्ट्रीय स्तरावरही नावलौकिक मिळवला आहे. आई-वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्रियाने दिग्दर्शन क्षेत्रातही आपली चुणूक दाखवली आहे. ‘द पेन्टेड सिग्नल’ आणि ‘ड्रेसवाला’ या दोन शॉर्टफिल्म्स तिने दिग्दर्शित केल्या आहेत. यासोबतच ‘पंचगव्य’ या डॉक्युमेंट्रीचंही दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे 'तेजस्वी चेहरा' या पुरस्कारासाठी तिची निवड केली जाणं हे योग्य वाटतं.हेही वाचा -

रणवीर-आलियाच्या 'गली बॉय'चा ट्रेलर प्रदर्शित

शशांक, मृणाल आणि शर्मिष्ठाची ऑफस्क्रीन धम्माल!संबंधित विषय
ताज्या बातम्या