Advertisement

चैतन्य देवढेचं पहिलं गाणं रिलीज !

चैतन्य देवढे या बालगायकाचं नाव आज अवघ्या महाराष्ट्राला परिचयाचं झालं आहे. आपल्या मनमोहक आवाजाच्या बळावर ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीतील या चैतन्यने सर्वांचं मन जिंकलं आहे. आता पार्श्वगायकाच्या रूपातही त्याची कारकिर्द सुरू झाली आहे. चैतन्यचं पहिलं मराठमोळं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे.

चैतन्य देवढेचं पहिलं गाणं रिलीज !
SHARES

चैतन्य देवढे या बालगायकाचं नाव आज अवघ्या महाराष्ट्राला परिचयाचं झालं आहे. आपल्या मनमोहक आवाजाच्या बळावर ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीतील या चैतन्यने सर्वांचं मन जिंकलं आहे. आता पार्श्वगायकाच्या रूपातही त्याची कारकिर्द सुरू झाली आहे. चैतन्यचं पहिलं मराठमोळं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे.


यांनी दिली पहिली संधी

चैतन्य देवढेला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. 'सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर' या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळेच अल्पावधीतच पार्श्वगायकाच्या रूपातील त्याच्या कारकिर्दीलाही सुरुवात झाली आहे. कॅमेरामन-दिग्दर्शक संजय जाधवने आपल्या 'लकी' आगामी मराठी सिनेमात चैतन्यला ब्रेक दिला आहे. संजयने यापूर्वी रोहित राऊतला 'दुनियादारी' या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत लाँच केलं आहे.कोंकणी गाणं

संजयने दिग्दर्शित केलेल्या 'लकी' सिनेमातील 'माझ्या दिलाचो...' हे कोंकणी गाणं चैतन्यच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. चैतन्यचे हे पहिलं मराठी गाणं आहे. गीतकार 'यो' (सचिन पाठक)च्या शब्दांना संगीतकार पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे. चैतन्यच्या आवाजातील हे गाणं 'लकी'मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभय महाजनवर चित्रीत करण्यात आलं आहे.निरागस आवाज

या गाण्यासाठी एका लहान मुलाचा आवाज हवा होता.त्यात संजयला चैतन्यचा आवाज खूप आवडला होता. आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या चैतन्यच्या आवाजातील निरागसता या गाण्याला अगदी साजेशी असल्याचं संजयला वाटलं आणि चैतन्यचा चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरू झाला. याबाबत संगीतकार पंकज पडघन म्हणाले की, मला आणि संजयदादांना नेहमीचनव्या प्रतिभेसोबत काम करायला आवडतं. चैतन्यची आकलनक्षमता खूप चांगली आहे. त्याने एका दिवसातच या गाण्याचा रियाज करून रेकॉर्डिंगही केलं. हे कोंकणी गाणे ऐकताना तो कोंकणी पहिल्यांदाच बोलतोय, असं अजिबात वाटणार नाही, ही या गाण्यातली जमेची बाजू असल्याचंही पडघन म्हणाले.मी लकी

आपल्या पहिल्या ब्रेकबाबत चैतन्य म्हणाला की, मी स्वत:ला खूप लकी समजतो की, सिनेसृष्टीतल्या अशा दिग्गजांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत पंकज पडघन यांनी संगीतबध्द केलेली गाणी ऐकली होती आणि संजयदादांचे सिनेमे पाहिले होते, पण या दोन दिग्गजांना प्रत्यक्ष भेटायची, तसंच त्यांच्या सिनेमातून चित्रपटसृष्टीत लाँच होण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यावर माऊलींचीच कृपा असल्याचं मी मानतो.

हेही वाचा -

अर्धनग्न मोर्चा यशस्वी, शेतकऱ्यांच्या संमतीनेच जमीन संपादन होणार, उद्योगमंत्र्यांचं आश्वासन

रंगभूमीवर अवतरलं 'अजिंक्य योद्धा'संबंधित विषय
Advertisement