अर्धनग्न मोर्चा यशस्वी, शेतकऱ्यांच्या संमतीनेच जमीन संपादन होणार, उद्योगमंत्र्यांचं आश्वासन


  • अर्धनग्न मोर्चा यशस्वी, शेतकऱ्यांच्या संमतीनेच जमीन संपादन होणार, उद्योगमंत्र्यांचं आश्वासन
SHARE

साताऱ्यातील खंडाळ्यातील शेतकऱ्यांशी अखेर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी चर्चा केली आहे. या चर्चेदरम्यान शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन संपादीत करणार नाही असं आश्वासन देसाई यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिलं आहे. तर आठवड्याभरात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी खंडाळ्यातील गावांना भेटीत देत गावांची पाहणी करण्याचे आदेशही देसाई यांनी दिले आहेत. एकूणच या चर्चेत शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा निघाला असून शेतकऱ्यांनी देसाई आणि सरकारचे आभार मानले असून शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चाही अखेर यशस्वी ठरला आहे.जमीन संपादन प्रक्रियेत फसवणूक 

खंडाळ्यातील शेतकऱ्यांची जमीन संपादन प्रक्रियेत फसवणूक झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तर शेतकऱ्यांची संमती नसताना जबरदस्तीने जमीन घेतल्याचाही शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांनी संबंधित यंत्रणांकडे यासंबंधी तक्रार केल्यानंतरही त्यांना न्याय मिळत नव्हता. त्यामुळे अखेर शेतकऱ्यांनी आपला आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी थेट मुंबईला धाव घेण्याचा निर्णय घेतला. तर आपल्या मागण्यांकडे सर्वांचंच लक्ष वेधण्यासाठी खंडाळ्यातील या शेतकर्यांनी चक्क अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयाला धडक देण्याचं ठरवलं.


चर्चा यशस्वी

त्यानुसार रविवारी सकाळी शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा मुंबईच्या वेशीवर पोहचला होता आणि तिथंच त्यांना पोलिसांनी अडवलं होतं. तर सरकारनं या मोर्चाची दखल घेत सोमवारी चर्चेसाठी बोलावलं. त्यानुसार अखेर देसाई आणि शेतकऱ्यांच्या सहा जणांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली असून ही चर्चा यशस्वी ठरली आहे. शेतकर्यांच्या संमतीनेच जमीन संपादीत केली जाईल, हरकत असलेल्या जमिनींचं संपादन केलं जाणार नाही, टप्पा-३ मधील लाभ क्षेत्रातील जमिनी वगळल्या जातील अशी आश्वासन यावेळी देसाई यांनी शिष्टमंडळाला दिली आहेत. या आश्वासनानं शेतकऱ्यांच समाधान झालं असून त्यांनी आपले आणि सरकारचे आभार मानल्याची माहिती देसाई यांनी चर्चेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.हेही वाचा -

संपादरम्यान अर्धागवायूचा झटका आलेल्या बेस्ट चालकाचा मृत्यू

खंडाळ्यातील शेतकरी मंत्रालयात, तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्रसंबंधित विषय
ताज्या बातम्या