Advertisement

संपादरम्यान अर्धागवायूचा झटका आलेल्या बेस्ट चालकाचा मृत्यू


संपादरम्यान अर्धागवायूचा झटका आलेल्या बेस्ट चालकाचा मृत्यू
SHARES

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान चौथ्या दिवशी आलेल्या अर्धांगवायूच्या झटक्यामुळे बेस्टचे चालक रवींद्र काशीनाथ वाघमारे (४२) यांचं रविवारी सकाळी निधन झालं. अर्धांगवायूचा झटका आला त्यावेळी रवींद्र हे देवनार डेपोत होते. रवींद्र हे संपात सहभागी होते. संपादरम्यान डेपोत पहारा देत असताना त्यांना पहाटे अर्धांगवायूचा झटका आला. त्यावेळी तातडीनं त्यांना उपचारांसाठी लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाघमारे कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे

बेस्टचे चालक रवींद्र वाघमारे हे खारघर इथं राहत असून त्यांना दीड वर्षांची मुलगी आहे. संपाच्या चौथ्या दिवशी देवनार बस डेपो इथं रवींद्र कामावर आले होते. त्यावेळी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्याचवेळी रवींद्र यांना अर्धागवायूचा झटका आला अाणि त्यांच्या शरीराची डावी बाजू निकामी झाली. रवींद्र यांना तात्काळ गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावल्यानं लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा