बाहुबली पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

 Mumbai
बाहुबली पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
Mumbai  -  

कट्टपाने बाहुबली ला का मारलं या प्रश्नाचं उत्तर आज प्रेक्षकांना मिळणार आहे. याचं कारण आहे बाहुबलीचा दुसरा भाग. पहिल्या भागाला प्रेक्षकांनी पसंती दिल्यानंतर आज बाहुबलीचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला आहे.  या चित्रपटातील क्लायमॅक्स पाहण्यासाठी थिएटरमध्ये तरुणाईने एकच गर्दी केली आहे. विशेष म्हणजे तिकीटासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

2015 मध्ये प्रदर्शीत झालेल्या बाहुबली - द बिगिनिंग ने बॉक्स ऑफिसवर 600 कोटी रुपयांची कमाई केली होती. आज बाहुबली-2 चित्रपट हा देशभरातील 6500 स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Loading Comments