सनीच्या सिनेमाला वाढदिवसाचा मुहूर्त


SHARE

‘पोष्टर बॅाईज’ या सिनेमानंतर अभिनेता सनी देओल पुन्हा एकदा मल्टीस्टारर सिनेमात दिसणार आहे. ‘भैयाजी सुपरहिट’ असं शीर्षक असलेल्या या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी निर्मात्यांनीही सनीचा वाढदिवस आणि दसऱ्याचा मुहूर्त साधला आह

‘भैयाजी सुपरहिट’ सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं. त्यावर १९ आॅक्टोबर अशी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. १९ आॅक्टोबरला सनीचा वाढदिवस आहे.  तर १८ आॅक्टोबरला दसरा आहे.


निर्मिती मेट्रो मुव्हीजकडून

हनवंत खत्री आणि ललीत किरी यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची निर्मिती मेट्रो मुव्हीजने केली आहे. चिराग धारीवाल यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन नीरज पाठक यांनी केलं आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर दोन्ही हातात रिव्हॅाल्व्हर घेतलेला सनी दिसतो. त्याच्या जोडीला काहीशा फंकी लुकमध्ये श्रेयस तळपदे आणि अरशद वारसीही आहेत. त्यांच्या मागे प्रिती झिंटा आणि अमिषा पटेल या सिनेमाच्या नायिका आहेत. इतकंच नव्हे तर संजय मिश्रा पुन्हा एकदा नव्या रूपात दिसतात.


सनी दुहेरी भूमिकेत

ब्रिजेंद्र काला, जयदीप अहलावत, मुकुल देव, पंकज त्रिपाठी आणि पंकज झा यांच्याही या सिनेमात भूमिका आहेत. अॅक्शन-कॅामेडी असलेल्या पाठक यांच्या या सिनेमात सनीने दुहेरी भूमिका साकारली आहे. प्रथमच दुहेरी भूमिका साकारणाऱ्या सनीची दोन रूपं या सिनेमात पाहायला मिळतील. यातील एक फिल्मी, तर दुसरा यूपीतील अंडरवर्ल्डशी निगडीत आहे.हेही वाचा -


दिग्दर्शनाचा डेब्यू अन् सिनेमाची हॅटट्रीक!

मालिका दिग्दर्शक बनला पायलट
संबंधित विषय
ताज्या बातम्या