Advertisement

दिग्दर्शनाचा डेब्यू अन् सिनेमाची हॅटट्रीक!

खरं तर ‘रे राया’ हा मिलिंदने दिग्दर्शित केलेला तिसरा चित्रपट आहे. ‘नाच तुझंच लगीन हाय’ हा पहिला सिनेमा सेन्सॅारच्या कात्रीत अडकल्यानंतर माघार न घेता मिलिंदने ‘भिडू’ हा आणखी एक वेगळ्या विषयावरील सिनेमा बनवला, जो प्रदर्शनाच्या वाटेवर आहे, पण ‘रे राया’ कानामागून आला आणि तिखट बनला. ‘रे राया’चं काम जलद गतीने पूर्ण झाल्याने हा सिनेमा दिग्दर्शकाच्या रूपातील प्रदर्शित होणारा मिलिंदचा पहिला सिनेमा ठरणार आहे.

दिग्दर्शनाचा डेब्यू अन् सिनेमाची हॅटट्रीक!
SHARES

‘नाॅट ओन्ली मिसेस राऊत’पासून राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या ‘बाबू बँड बाजा’ या सिनेमापर्यंत नेहमीच विविध बाजाच भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद शिंदे दिग्दर्शकाच्या भूमिकेत शिरतोय ही बातमी तशी नवीन नाही. ‘नाच तुझंच लगीन हाय’ या सिनेमाद्वारे मिलिंदने दिग्दर्शन कारकिर्दीला सुरुवात केली, पण हा सिनेमा प्रदर्शितच न झाल्याने त्याचं पदार्पण रखडलं होतं. पण आता ‘रे राया’ सिनेमाद्वारे त्याचं खऱ्या अर्थाने पदार्पण होतं आहे. २० जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या निमित्ताने मिलिंदने ‘मुंबई लाइव्ह’शी केलेली ही खास बातचीत.


तिसऱ्याने मारली बाजी...

खरं तर ‘रे राया’ हा मिलिंदने दिग्दर्शित केलेला तिसरा चित्रपट आहे. ‘नाच तुझंच लगीन हाय’ हा पहिला सिनेमा सेन्सॅारच्या कात्रीत अडकल्यानंतर माघार न घेता मिलिंदने ‘भिडू’ हा आणखी एक वेगळ्या विषयावरील सिनेमा बनवला, जो प्रदर्शनाच्या वाटेवर आहे, पण ‘रे राया’ कानामागून आला आणि तिखट बनला. ‘रे राया’चं काम जलद गतीने पूर्ण झाल्याने हा सिनेमा दिग्दर्शकाच्या रूपातील प्रदर्शित होणारा मिलिंदचा पहिला सिनेमा ठरणार आहे.



पहिल्याला सेन्सॅारचं ग्रहण!

२०१३ मध्ये मिलिंदने ‘नाच तुझंच लगीन हाय’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं, पण हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. याबाबत मिलिंद म्हणाला की, हा सिनेमा ज्वलंत विषयावर आधारीत आहे. त्यात सेन्सॅारने खूप कट्स सुचवले. ६८ कट्स केल्यानंतर त्या सिनेमात उरलं काय? हा प्रश्न होताच. त्यामुळे रिलीज होऊ शकला नाही.


‘रे राया’ खेळावर आधारीत...

‘रे राया’ची कथा खेळावर आधारीत असल्याचं सांगत मिलिंद म्हणाला की, धावणे, नेमबाजी आणि कसरती या खेळांना या सिनेमात प्राधान्य देण्यात आलं आहे. बऱ्याचदा आपल्या प्रयत्नांचा अनुल्लेख केला जातो, नाकारलं जातं. त्या नाकारल्यापणातून जी ऊर्जा येते, ती जिंकण्याची शक्ती देऊन जाते. त्या जिंकण्याच्या शक्तीवर आधारीत हा सिनेमा आहे.



‘रे राया’ हे शीर्षक का?

सिनेमाचं शीर्षक काहीतरी वेगळं हवं होतं. या शीर्षकात एक हाक दडली आहे. रे राया - हे सख्या, हे सवंगड्या, हे भावा, हे मित्रा... चल माझ्या सोबत असा त्याचा अर्थ आहे. आपण सोबत जाऊया आणि विजयी होऊया.


अशी आहे गोष्ट...

एका हरहुन्नरी खेळाडूला पुरस्कार नाकारला जातो आणि मग तो कसा आपल्या परीने स्वत:चा लढा उभारतो. एका नव्या पिढीला सोबत घेऊन कसा शेवटापर्यंत जातो आणि विजयी होतो त्याची गोष्ट या सिनेमात आहे.



तीन संदेश...

जिथं मी हरलो तिथंच पुन्हा जिंकून दाखवेन हा महत्त्वाचा संदेश या सिनेमात आहेच. यासोबतच हा सिनेमा हक्क मागण्याचा आहे, तिथं उभं राहून लढा उभारण्याचा आहे, ‘पे बॅक टू द सोसायटी’ असं म्हणत समाजाला परत देण्याचा आहे. केवळ दाखवायला हा खेळाचा आकृतीबंध घेतला असून, खेळाच्या माध्यमातून जिंकण्याचा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.


भूषण कोचच्या भूमिकेत...

ही चौघांची कथा आहे. भूषणने साकारलेल्या खेळाडूला पुरस्कार नाकारल्यावर तो मैदान सोडतो. गावाकडे निघून जातो. तिथे त्याला तीन मुलं भेटतात, जी धावण्यात, नेमबाजीत आणि कसरतीत पटाईत असतात. त्यांच्या निसर्गदत्त देणग्या पाहिल्यावर भूषणच्या स्वप्नांना पुन्हा पालवी फुटते. त्यांना लाभलेल्या निसर्गदत्त देणग्यांची सांगड तो उचित तंत्राशी घालतो.


हंसराज, विवेक, सुदर्शनचं त्रिकूट...

या सिनेमासाठी नट हवे होतेच, पण ते प्रयत्न करणारे हवे होते. हंसराजचा अभिनय मला आवडतो. त्याच्यामध्ये जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. विवेक चाबूकस्वारने ‘बाबू बँड बाजा’मध्ये माझ्यासोबत काम केलं होतं. त्यामुळे त्याची अभिनयक्षमता मला ठाऊक होती. तिसऱ्यासाठी कसरती करणाराच मुलगा हवा होता. त्यासाठी शोध घेतला. सुदर्शन पाटीलच्या रूपात आमचा शोध संपला.



हेही वाचा-

मालिका दिग्दर्शक बनला पायलट

चांगलं-वाईट समजण्याच्या वयातील ‘यंग्राड’ मुलांची गोष्ट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा