Advertisement

विशाल निकम बिग बॉस मराठी सिझन 3 चा विजेता


विशाल निकम बिग बॉस मराठी सिझन 3 चा विजेता
SHARES

विशाल निकम बिग बॉस मराठी सिझन 3 चा विजेता ठरला आहे. तर जय दुधाने उपविजेता ठरला आहे. 

जवळपास १०० दिवस या घरात राहिल्यानंतर मीनल शहा या घरातून बाहेर पडली. तिच्याच पाठोपाठ आता उत्कर्ष शिंदे देखील बाहेर पडला. 

आज रंगलेल्या बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये मीनल शहा पाठोपाठ उत्कर्ष शिंदेचादेखील प्रवास थांबला आहे.

त्यानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या मतामुळे जय, विकास आणि विशाल सेफ झाले. त्यामुळेही तीनही स्पर्धक टॉप ३ फायनलिस्ट ठरले. पण त्यातून विकास घराबाहेर पडला. त्यानंतर जय आणि विशाल हे अंतिम स्पर्धक राहिले. 

घरातून बाहेर पडताना याजय आणि विशाल या दोघांनी बिग बॉसच्या घरातील दिवे बंद केले. दिवे बंद केल्यानंतर आपाल्या नावाची पाटी घेऊन दोघेही बाहेर आले. 

बाहेर आल्यानंतर महेश मांजरेकर यांनी दोघांचं स्वागत केलं. विजेत्याच नावाची घोषणा होईपर्यंत सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, उत्तम टास्क खेळण्याची पद्धत आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय यामुळे उत्कर्ष शिंदे याला यंदाच्या पर्वातील मास्टर माईंड ही नवीन ओळख मिळाली होती. त्यातच उत्कर्ष यंदाच्या पर्वाचा विजेता ठरेल असंही अनेकांना वाटलं होतं. मात्र, त्याचा हा प्रवास अर्ध्यावरच थांबला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा