Advertisement

बिग बॉस मराठी - नवा दिवस, नवे टास्क!


बिग बॉस मराठी - नवा दिवस, नवे टास्क!
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गुरूवारीसुद्धा रंगलं 'अंडे का फंडा' हे आठवड्याचं टास्क. या टास्कमधील सुशांत आणि आस्तादमध्ये या आठवड्याच्या कॅप्टन्सीसाठीची चुरस रंगणार आहे. आपल्या संस्कृतीमध्ये श्री फळाचे खूपच महत्व आहे. म्हणूनच बिग बॉस 'सत्कार मूर्ती' हे कॅप्टन्सीचे टास्क घरातील सदस्यांवर आज सोपवणार आहेत. तेव्हा या आठवड्यामध्ये कोण होईल बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन? हे बघणं रंजक ठरणार आहे.रेशमला शोभतो 'अति आत्मविश्वास'?

काल रंगलेल्या टास्कमध्ये स्मिता आणि मेघाच्या जोडीला 'फ्रेश फेस' हे टायटल मिळालं. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये 'निरीक्षण परीक्षण' हे टास्क रंगणार आहे. घरातील सर्व सदस्यांना त्यांच्या बिग बॉसच्या घरातील प्रतिमेनुसार क्रमवारी ठरवायची आहे. सगळ्यांना विशेषणांचे फलक देण्यात येणार आहेत. त्यानुसार घरातील कुठल्या सदस्याला ते विशेषण शोभेल या निकषावर हे कार्य आधारित असेल. सदस्यांनी आपापसात चर्चा करून १ ते ५ अशी क्रमवारी ठरवायची आहे. ज्यामध्ये पहिला फलक होता 'अति आत्मविश्वास'. सईच्या मताप्रमाणे हे रेशम टिपणीसला शोभते. परंतु, यावरूनच सई आणि रेशममध्ये वाद होणार आहे.फॉग मस्त, दिवस जबरदस्त!

'बिग बॉस' मराठीच्या घरात आज अजून एक टास्क रंगणार आहे. 'फॉग मस्त दिवस जबरदस्त'. घरामध्ये प्रसन्नता पसरावी म्हणून सदस्यांना हे टास्क बिग बॉस सोपावणार आहेत. या कार्यासाठी सदस्यांची तीन टीममध्ये विभागणी करण्यात येईल. जी टीम सगळ्यात जास्त फॉग स्प्रे जमा करेल ती टीम या विजयी ठरणार आहे.हेही वाचा

ये आऊ नहीं, गब्बर है! बिग बॉस मध्ये होणार धमाल!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा