Advertisement

ये आऊ नहीं, गब्बर है! बिग बॉस मध्ये होणार धमाल!


ये आऊ नहीं, गब्बर है! बिग बॉस मध्ये होणार धमाल!
SHARES

काल बिग बॉसच्या घरात शर्मिष्ठा राऊतची एन्ट्री झाली. त्याचवेळी बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीचा टास्क रंगला. या टास्कसाठी घरातील सदस्यांनी सर्वानुमताने सुशांत आणि मेघाला कॅप्टन्सीसाठी उमेदवार म्हणून निवडले. बिग बॉस यांनी 'हुकमी चौकट' हे कॅप्टन्सीचे कार्य घरतील सदस्यांवर सोपावले. ज्यामध्ये उमेदवारांच्या सहनशीलतेची कसोटी लागली.


टीम सुशांतने मोडला नियम

प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या समर्थकांपासून आपापल्या उमेदवाराचे रक्षण करण्याचा प्रयत्न त्या उमेदवाराचे समर्थक करणार होते. प्रतिस्पर्धी समर्थकांनी दुसऱ्या टीमच्या उमेदवाराला चौकटीच्या कुठल्याही बाजूने खाली उतरण्यास भाग पाडायचे असून हाच समर्थकांचा उद्देश होता. ज्यामध्ये रेशम, आस्ताद म्हणजेच टीम सुशांत यांनी कार्याचा नियम तोडून मेघाला चौकटीच्या बाहेर पाडले. त्यामुळे बिग बॉस यांनी सुशांत नव्हे तर मेघावर बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन म्हणून जबाबदारी सोपावली. याशिवाय काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे त्यागराज खाडिलकर यांची एन्ट्री झाली.


रेशम टिपणीसचा मिस्टर इंडिया डान्स!

घरामध्ये आता खूपच उत्साहाचे वातावरण असणार आहे. ज्यामध्ये घरातील सदस्य वेगळ्या पोशाखात दिसणार असून ते अभिनय देखील सादर करणार आहेत. जसे रेशम टिपणीस श्री देवी सारखी साडी नेसून मिस्टर इंडिया मधील 'I Love You' या गाण्यावर नृत्य करताना दिसणार आहे. तर आऊ शोले मधील गब्बर सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. तेव्हा घरातील बाकीचे सदस्य काय सादर करणार आहेत? हे आज प्रेक्षकांना कळेलच!



हेही वाचा

बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणारा नवीन सदस्य कोण?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा