Advertisement

कोण असेल बिग बॉस मराठीच्या घरचा नवीन कॅप्टन?

घरातील सदस्य सर्वानुमताने सुशांत आणि मेघाला कॅप्टनसीसाठी उमेदवार म्हणून निवडणार आहेत. बिग बॉस “हुकमी चौकट” हे कॅप्टनसीचं कार्य घरतील सदस्यांवर सोपवणार आहेत. ज्यामध्ये उमेदवारांच्या सहनशीलतेची कसोटी लागणार आहे.

कोण असेल बिग बॉस मराठीच्या घरचा नवीन कॅप्टन?
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मर्डर मिस्ट्री या टास्कमध्ये आस्ताद आणि मेघा यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यात गुप्तहेर अयशस्वी ठरल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे आज घरातील सदस्य सर्वानुमताने सुशांत आणि मेघाला कॅप्टनसीसाठी उमेदवार म्हणून निवडतील.


घरात शर्मिष्ठा राऊतची एन्ट्री

काल रात्री बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळ्याच सदस्यांना एक सरप्राइज मिळालं. बिग बॉसच्या घोषणेनुसार हर्षदा खानविलकर यांनी काल बिग बॉस मराठीचं घर सोडलं असून त्या घरामध्ये फक्त सात दिवसांच्या पाहुण्या होत्या असं सांगितलं. हे ऐकताच सगळ्यांना धक्का बसला. याचसोबत या घरात शर्मिष्ठा राऊतची एन्ट्री झाली.


काय म्हणाली शर्मिष्ठा?

शर्मिष्ठा राऊत घरामध्ये आल्यानंतर तिने आपलं मत व्यक्त करण्यास सुरुवात केली. तिला आऊ, मेघा आणि सई ज्याप्रकारे खेळत आहेत ते खूपच आवडतं आणि बाहेर देखील हे चांगल्याप्रकारे दाखवलं जात आहे, असे त्यांना सांगितलं. सोबतच तिने मेघा आणि सईला संदेश आणि गिफ्ट देखील दिले. ही मैत्री आता पुढे किती टिकणार? कोण कोणाची साथ देणार? हे लवकरच कळेल.


घरामध्ये रंगणार कॅप्टनसीचा टास्क

घरातील सदस्य सर्वानुमताने सुशांत आणि मेघाला कॅप्टनसीसाठी उमेदवार म्हणून निवडणार आहेत. बिग बॉस “हुकमी चौकट” हे कॅप्टनसीचं कार्य घरतील सदस्यांवर सोपवणार आहेत. ज्यामध्ये उमेदवारांच्या सहनशीलतेची कसोटी लागणार आहे. यामध्ये घरातील सदस्यच या उमेदवारांच्या समर्थनाचं कार्य करणार आहेत. टीम मेघा आणि टीम सुशांत अशा दोन टीम असतील. उमेदवारांनी चौकटीच्या ठोकळ्यावर कोणताही आधार न घेता उभं रहायचं आहे. हे दोन्ही उमेदवार त्यांची जागा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतील. तसेच प्रतिस्पर्धी उमेदवाराला त्याच्या जागेवरून हटवण्याचा प्रयत्न दुसऱ्या टीममधील समर्थक करतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा