Advertisement

'बिग बॉस'मध्ये पहिल्याच दिवसापासून राडा!


'बिग बॉस'मध्ये पहिल्याच दिवसापासून राडा!
SHARES

टीव्ही शोमधील सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणजे 'बिग बॉस'. हा शो नुकताच सुरू झाला असून रविवारी कलर्स वाहिनीवर रात्री ९ वाजता हा शो प्रसारित झाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सलमान खान या शोचं सूत्रसंचालन करत आहे. 'बिग बॉस'मध्ये यावेळी 'शेजारी' ही हटके थीम ठेवण्यात आली आहे. मागील सीझनप्रमाणे यावेळीसुद्धा सेलिब्रिटींशिवाय सामान्य स्पर्धकांनी शोमध्ये सहभाग घेतला आहेत. शिवाय कित्येक दिवसांपासून 'बिग बॉस ११'मध्ये कोणते सेलिब्रिटी असतील याचीही उत्सुकता प्रेक्षकांना होती. अखेर रविवारच्या पहिल्या भागात या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत.



शिल्पा शिंदे

'भाभीजी घर पे है' या शोमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदे बिग बॉसमध्ये सहभागी झाली आहे. 'भाभीजी घर पे है' या शोमध्ये शिल्पा 'अंगुरी भाभी' ही व्यक्तीरेखा साकारत होती. पण दिग्दर्शकासोबत झालेल्या वादामुळे शिल्पाने हा शो सोडला होता. त्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली होती.



प्रियंक शर्मा

प्रियंक शर्मा हा टेलिव्हीजन विश्वातील रायझिंग स्टार आहे, असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोपूर्वी त्याने दोन शो केले आहेत. 'रोडिज' या शोमधून त्याने टेलिव्हीजन इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. एमटीव्हीच्या 'स्पिट्सविला' या शोमुळे प्रियंक फेमस झाला. त्यामुळे इतरांसाठी तो नक्कीच टफ फाइट देऊ शकतो



हिना खान

'ये रिश्ता क्या कहलाता है', या कार्यक्रमामुळे हिना खान फेमस झाली. पण काही कारणास्तव हिनाने हा कार्यक्रम सोडला होता. 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये सुद्धा तिने सहभाग घेतला होता. पण 'खतरों के खिलाडी' या शोची ट्रॉफी जिंकण्यात ती अपयशी ठरली. पण 'बिग बॉस ११'मुळे पुन्हा एकदा हिनाला जिंकण्याची संधी मिळाली आहे.




हितेश तेजवानी

हितेश तेजवानी हा चेहरा टेलिव्हीजन इंडस्ट्रीसाठी काही नवीन नाही. 'क्यूं की सास भी कभी बहू थी', 'कुमकुम', 'पवित्र रिस्ता', 'गंगा' अशा अनेक मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. तसेच 'जोडी कमाल की' आणि 'नच बलिए २' यांसारख्या शोमध्येही हितेश स्पर्धक म्हणून झळकला आहे.  


विकास गुप्ता

'ये है आशिकी' आणि 'प्यार तुने क्या किया' यासारख्या मालिकांमध्ये विकासने काम केले आहे. विकास गुप्ता हा एका टेलिव्हीजनमध्ये क्रिएटीव्ह हेड म्हणून काम पाहतो. पार्थ समथानसोबत असलेल्या वादग्रस्त रिलेशनशिपमुळे तो प्रकाशझोतात आला होता. एसटीव्हीवरील 'कैसी है ये यारिया' या शोचा तो एक भाग होता.  


सपना चौधरी

सपना चौधरी ही दिल्ली, हरियाणा आणि युपी यांसारख्या उत्तरेकडील राज्यात प्रचंड फेमस आहे. ती एक डान्सर आणि सिंगर अाहे. बिग बॉसच्या घरातील एक प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणून तिला मानले जाते. सपना चौधरीने २०१६ साली विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सपना जास्त प्रकाशझोतात आली होती



अर्शी खान

अर्शी खान पाकिस्तान क्रिकेटर शाहीद आफ्रिदीची गर्लफ्रेंड असल्याची चर्चा होती. त्यानंतर तिने तुफान पब्लिसिटी मिळवली होती.


शिवानी दुर्गा

शिवानी दुर्गा अघोर तंत्राबरोबर पश्चिमात्य देशांमधील गूढ तंत्र यांची साधिका आहे. अमेरिकेतून पीएचडी केल्यानंतर शिवानी स्मशानात साधना करणाऱ्या अघोरी तांत्रिकांची गाइड बनली आहे.  यांचे भक्त आणि अनुयायी जगातील अनेक देशांमध्ये आहेत.


बेनअफशा सोनावाला

बेनअफशा सोनावाला ही व्हीडिओ जॉकी आहे. 'रोडिज एक्स १३' या पर्वात ती झळकली होती. रोडिजमध्ये सहभागी असलेल्या वरुण सूदसोबत तिच्या अफेअरची चर्चा आहेत.



आकाश ददलानी

रॅपर आकाश ददलानी हा एनआरआय असून अमेरिकेत त्याचा बिझनेस आहे. सिंगिंगमध्ये करिअर करण्यासाठी तो भारतात आला आहे.


ज्योती कुमारी

मूळची पाटण्याची असलेली ज्योती कुमारी विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करते. एका मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेल्या ज्योतीचे आयएएस बनण्याचे स्वप्न आहे.


जुबैर खान

जुबैर खान हा दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरचा जावई आहे. त्यामुळे इतर स्पर्धकांपेक्षा ही वेगळी ओळख त्याला चर्चेत ठेवण्यासाठी पुरेशी ठरत आहे.


'बिग बॉस'मध्ये 'तू-तू, मै-मै'

बिग बॉस सुरू होऊन काही तास होत नाहीत तोच स्पर्धांकांध्ये तू-तू मै-मै देखील सुरू झाली आहे. पण या सर्वातही सेलिब्रेट करण्याची एकही संधी स्पर्धक सोडत नाहीत.




लोणावळ्यातील १९०० स्क्वेअर फूट परिसरात पॉप आर्ट थीममधील हे घर ओमंग कुमार यांनी डिझाइन केले आहे.




हेही वाचा -

आबब ! बिग बॉसच्या एका भागासाठी सलमान एवढं घेतो मानधन


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा